Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारने Apple कडून 27 आयफोन-लॅपटॉपची माहिती मागितली

business news
Webdunia
सरकारने या वर्षी जानेवारी ते जून या काळात Apple कडून 27 डिव्हाईस आणि 18 खात्यांबद्दल माहिती मागितली. बरेच प्रकरण आयट्यून्स गिफ्ट कार्डमध्ये फसवणूक संबंधित होते. याव्यतिरिक्त, वित्तीय प्रकरणांमध्ये ओळखीसाठी 34 अर्ज प्राप्त झाले आहे. Apple ने ही माहिती सोमवारी जाहीर केलेल्या ट्रांसपरेंसी रिपोर्टमध्ये दिली आहे. त्यानुसार, 63% प्रकरणांमध्ये त्यांनी सरकारला माहिती दिली आहे. त्याचवेळी 85% आर्थिक प्रकरणांचा डेटा देखील सरकारला देण्यात आल्या. Apple प्रत्येक 6 महिन्यांत ही रिपोर्ट प्रकाशित करत असून गेल्या वर्षी जुलै पासून डिसेंबर पर्यंत 27 प्रकरणांमध्ये सरकारने कंपनीकडून माहिती मागितली होती. Apple ने 14 चा डेटा दिला होता. कंपनीला जगभरातील 32,342 अर्ज प्राप्त झाले होते, ज्यात 1.64 लाख डिव्हाईसची माहिती मागितली गेली होती. 
 
Apple ने 80% प्रकरणात माहिती दिली. संख्यांच्या बाबतीत, हा आकडा सुमारे 25 हजार आहे. गेल्या वर्षीच्या जुलै-डिसेंबरपेक्षा हे 9% जास्त आहे. जुलै-डिसेंबर 2017 दरम्यान विविध सरकारांनी 29,718 प्रकरणांची माहिती मागितली होती. Apple ने यापैकी 79% प्रकरणे नोंदवली. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच Apple ने ट्राईच्या अॅपबद्दल सरकारच्या अटींवर सहमती दर्शविली आहे. Apple आपल्या ऍप स्टोअरवर ट्राईच्या डू नॉट डिस्टर्ब (DND) ऍपला प्रकाशित करण्यासाठी तयार झाली आहे. आता ट्राईचा DND ऍप Apple च्या ऍप स्टोअरवरून आयफोन वर डाउनलोड केले जाऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

2,700 कोटी रुपयांच्या 'नमामी गोदावरी' प्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील दाखवला

सोलापुरात विहीर कोसळल्याने पोहण्यासाठी गेलेली 2 निष्पाप मुले ढिगाऱ्यात अडकली,मृतदेह सापडले

LIVE: नमामी गोदावरी' प्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील दाखवला

23 वर्षीय शिक्षिका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यापासून गर्भवती

महाराष्ट्र काँग्रेसने जातीच्या जनगणनेचे स्वागत केले, हर्षवर्धन सपकाळने दिले राहुल गांधींना श्रेय

पुढील लेख
Show comments