Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सध्या २०० रुपयांची नोट उपलब्ध नाही

Webdunia
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्याने आणलेली २०० रुपयांची नोट एटीएमवर उपलब्ध होण्यासाठी आणखी तीन महिने लागणार आहेत. ही नोट एटीएममधून उपलब्ध करून देण्यासाठी या यंत्रांची मोठ्या प्रमाणावर फेररचना (रिकॅलिब्रेशन) करावी लागणार आहे. काही बँकांनी एटीएम कंपन्यांना या नव्या नोटेची चाचणी घेण्यास सांगितले असले तरी त्यांना २०० च्या नोटाच उपलब्ध झालेल्या नाहीत.
 
याबाबत एटीएम यंत्रांत २०० रुपयांच्या नोटेसाठी बदल करून घेण्यास रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला अजून आदेश आलेला नाही, असे एटीएम उत्पादक कंपन्यांनी म्हटले. बँकेकडून आम्हाला आदेश मिळाला की आम्ही यंत्रांत तसा बदल करून घेऊ, असे एजीएस ट्रॅन्झॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे अध्यक्ष आर. बी. गोयल यांनी सांगितले. एजीएसने देशभर ६० हजार एटीएम बसवले आहेत. ही नवी नोट आम्हाला मिळाली की त्यानुसार एटीएमच्या कॅसेटमध्ये बदल केले जातील. हा तांत्रिक बदल करून घेण्यासाठी ९० दिवस लागतील असे गोयल यांनी सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

शुभेच्छा न देता राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली, शिंदे म्हणाले- जाणूनबुजून केला गेला अपमान

LIVE: रेखा गुप्ता यांचा रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा

भीषण अपघातात ९ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी

अमेरिकेत आणखी एक विमान अपघात, २ जणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत..पालकमंत्री उईके यांनी घेतली आढावा बैठक, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पुढील लेख
Show comments