Dharma Sangrah

कांदा अनुदानातून लाल शब्द काढून टाका, सरसकट अनुदान द्या

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (21:21 IST)
कांदा अनुदानातून लाल कांदा हा शब्द काढून सरसकट कांदा अनुदान मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे पालकमंत्री दादा भुसे  यांच्याकडे करण्यात आली आहे.
 
भुसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी आणि काही राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान  जाहीर केले आहे. हे अनुदान देण्यासाठी दि.27 मार्च रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकात कांदा अनुदानासाठी ज्या काही अटी शर्ती घालून दिलेले आहेत. त्यामध्ये फक्त लेट खरीप लाल कांदा असा उल्लेख आहे. परंतु कांद्याला कमी दर मिळाला म्हणून अनुदान द्यावे, अशी मागणी असून खरीप लाल कांदा किंवा रब्बी उन्हाळ कांदा असा भेदभाव न करता कवडीमोल दराने विकल्या गेलेल्या खरीप लाल आणि रब्बी उन्हाळी कांद्याला सरसकट अनुदान द्यावे.
 
तसेच अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नसल्याने सातबारा उताऱ्यावर कांदा पिक नोंद असल्याची अट देखील रद्द करावी,अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र पालकमंत्री यांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांनी मालेगाव भेटीत दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

मनरेगाचे नाव बदलून 'जी राम जी' योजना करणार, मोदी सरकार विधेयक आणणार

सचिनने वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला विश्वविजेत्याची 10 क्रमांकाची जर्सी भेट दिली

जपानमध्ये दोन जणांवर चाकूने हल्ला, आरोपीला अटक

पुण्यातील वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वी गर्भधारणा चाचणी करणे आवश्यक असल्याचा विद्यार्थिनींसाठी विचित्र आदेश

पुढील लेख
Show comments