Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bigg Boss Marathi Season 3 : तृप्ती देसाई बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्या, अश्रू अनावर झाले

Webdunia
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (11:38 IST)
कलर्स मराठी या चॅनल वरील बिगबॉस मराठी 3 हा रियालिटी शो प्रचंड गाजत आहे. या बिगबॉस मराठी 3 मधून तृप्ती देसाई यांना निरोप दिला आहे. तृप्ती देसाई यांनी बिगबॉस मराठी 3 च्या घरात 49 दिवस राहून प्रेक्षकांना आपले वेगळे रूप दाखवले. राज्यभरात आपल्या ताईगिरीने प्रख्यात झालेल्या तृप्ती देसाई यांनी इतर स्पर्धकांना निरोप दिला. त्यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले. या क्षणी महेश मांजरेकरांना देखील वाईट वाटले. तृप्ती या बिगबॉसच्या घरात सर्वात स्ट्रॉंग स्पर्धक मानल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी तृप्ती आणि सोनाली पाटील यांच्यात बाचाबाची झाली तेव्हा तृप्तीने सोनालीला 'माझ्याशी नीट बोलायचं' असं दटावले होते. तेव्हा सोनालीने या महिलेच्या हक्का साठी भांडतात  'भांडण्यात पहिला नंबर' असा टोला लगावला. तृप्ती या महिलांच्या हक्कासाठी लढतात.मग ते शनी मंदिरात महिलांसाठी प्रवेश असो, किंवा शबरीमाला मंदिरात महिलांसाठी प्रवेश असो. त्या महिलेच्या हक्कासाठी समाजाशी लढल्या. त्यांनी बिगबॉसच्या घरात आपले आगळे वेगळे रूप दाखवले. कधी त्या भांडल्या तर कधी सर्व स्पर्धकांसाठी काळजी घेत मायाही केली. त्यांना अन्नपूर्णा बनून खाऊ देखील घेतले. त्यांच्या बिगबॉस मराठी 3 च्या घरातून बाहेर पडल्यावर गायत्री आणि मीराच्या अश्रूंचा बांधाच फुटला.
या शो मध्ये गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क मध्ये विशाल निकम, तृप्ती देसाई, जय दुधाणे ,
सोनाली पाटील आणि मीनल शाह हे  स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यात मीनल आणि विशाल हे सेफ झाले. नंतर सोनाली सेफ असल्याचे सूत्र संचालक महेश मांजरेकर यांनी सांगितले .आता तृप्ती देसाई आणि  जय दुधाणे या पैकी कोण स्पर्धक जाणार हे गूढच होते. नंतर मांजरेकर यांनी तृप्ती या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे सांगितले. आणि तृप्ती देसाईला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

पुढील लेख
Show comments