Dharma Sangrah

...अशी सुचली बॉईज-२ ची गोष्ट

Webdunia
बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (14:48 IST)
'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या 'बॉईज २' मध्येदेखील बॉईजची तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे. मात्र, या सिनेमाची गोष्ट एका घटनेने सुचली असल्याचे विशाल देवरुखकर सांगतात. 'बॉईज' च्या सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणदेखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अश्या विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हत. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला, आणि त्यातूनच 'बॉईज २' ची गोष्ट आम्हाला सापडली', असे विशाल देवरुखकर यांनी  सांगितले.
 
अवघ्या दोन तीन तासासाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर विशाल यांची इतकी अवस्था वाईट होऊ शकते, तर कॉलेजतरुणासाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल? असा प्रश्न विशाल यांना पडला. त्यांनी लागलीच हा विचार ऋषीकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशनेदेखील त्याला पसंती देत 'बॉईज २' चे लिखाण सुरु केले. अश्या या अनावधाने सुचलेल्या 'बॉईज २' चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या 'बॉईज' ची धम्माल पाहायला मिळणार आहे.
 
इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

लगान'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची IFFI च्या महोत्सव संचालकपदी नियुक्ती

‘बिग बॉस मराठी सीझन 6’चा ग्रँड फिनाले ठरला; 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

Raja Shivaji Review राजा शिवाजी चित्रपट परीक्षण: हा चित्रपट छत्रपती महाराजांना न्याय देतो का?

सेलेब्रिटी बारसं: अभिनेत्री सई कल्याणकरच्या लेकीचा नामकरण सोहळा; सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

मातृभूमीपासून ते पेड्डीपर्यंत, २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांची एक आकर्षक यादी

पुढील लेख
Show comments