Dharma Sangrah

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:05 IST)
रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात.
 
छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्यांच्या पराक्रमांवर चित्रपटांतून देखील अनेकदा प्रकाश टाकला गेला आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'हरीओम' हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचे पहिले टिझर पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित केले आहे.
 
चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर हा सिनेमा नक्कीच ऍक्शनपट असणार. पोस्टरवर पिळदार शरीरयष्टी असलेले दोन तरुण उभे असून त्यांच्या खांद्यावर जय जगदंब आणि जय दुर्गे असे लिहिले आहे. सोबतच समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि एक किल्ला देखील दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून लोकांमध्ये चित्रपटाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोस्टरवरील गोष्टींवरून हा सिनेमा जरी ऍक्शन ड्रामा वाटत असला तरी हा कौटुंबिक सिनेमा देखील असणार आहे.
 
चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर यांनी सांगितले की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये होती. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. आमच्यासाठी देखील शिवाजी महाराज आमचे दैवतच आहे. त्यामुळे आम्ही आमची पहिली कलाकृती त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरु करत आहोत. आज आमच्या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होत असून, आम्ही ते पोस्टर महाराजांना समर्पित करीत आहोत. आम्ही आमच्या सिनेमातून महाराजांची तत्त्वे नक्कीच लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू." तत्पूर्वी या चित्रपटाचे निर्माते असलेल्या हरिओम घाडगे यांनी तान्हाजी मालुसरेंच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले असून या शुभकामाचे भूमीपूजन झाले आहे.
 
श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाबाबतची  अधिकची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

पुढील लेख
Show comments