Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वतःवरच उलटला मयुरीचा कट

Webdunia
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (13:14 IST)
सेटवर कलाकारांचा नेहमीच कल्ला सुरु असतो. अनेक धमाल किस्से घडत असतात. असाच एक मजेशीर किस्सा 'प्रेमवारी'च्या सेटवरही घडला. चित्रपटाचा अभिनेता चिन्मय उदगीरकर याला घाबरवण्यासाठी अभिनेत्री मयुरी कापडणे हिने एक कट रचला होता आणि हे खुळ तिच्या डोक्यात भरवले होते अभिजीत चव्हाण यांनी. लाल साडी नेसून, केस मोकळे सोडून, अंगभर सर्वत्र सॉस लावून मयुरी चिन्मयच्या खोलीतील बाथरूममध्ये लपली आणि कटातील इतर सहकारी खोलीत आजूबाजूला लपून बसले, घाबरलेल्या चिन्मयचा व्हिडीओ काढण्यासाठी. रात्री साडेअकराला चिन्मय आला आणि तो थेट कार्यकारी निर्माता अभिजीत यांच्या खोलीत गेला. खूप वेळ झाला चिन्मय येत नसल्याने कंटाळून अखेर एक एक जण खोलीतून बाहेर येऊ लागले. शेवटी वैतागून मयुरीसुद्धा खोलीतून बाहेर आली. आणि थेट चिन्मयासमोर जाऊन उभी राहिली. मयुरीला अशा अवस्थेत बघून चिन्मयला खूपच हसू आले. मुळात हा सर्व कट चिन्मयला आधीच कळला होता. त्याच्या एका हितचिंतकाने हा कट त्याला सांगितला होता. मयुरीचा हा कट फिस्कटून, तो मस्त घोरत झोपला होता. आणि हा हितचिंतक दुसरा, तिसरा कोणीही नसून अभिजीत चव्हाण होता. हा कट स्वतःवरच उलटल्याचे लक्षात येताच, तीसुद्धा हसू लागली. सेटवर अशाच मस्त गमतीजमती करत साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक राजेंद्र कचरू गायकवाड असून प्रस्तुतीची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. चित्रपटात चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजीत चव्हाण यांच्यसह भारत गणेशपुरे यांचीही प्रमुख भूमिका आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

पुढील लेख
Show comments