Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज कुंद्रा प्रकरणी अभिनेता उमेश कामतला का झाला नाहक मनस्ताप?

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (18:21 IST)
राज कुंद्रा प्रकरणाची बातमी देताना त्यातील 'उमेश कामत' नावाच्या संशयित व्यक्तीचा उल्लेख करताना काही माध्यमांनी मराठी अभिनेता उमेश कामत यांचा फोटो वापरला.
 
शहानिशा न करता आपला फोटो वापरल्याने झालेलया बदनामीबद्दल उमेश कामत यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित माध्यमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मराठी अभिनेता उमेश कामत यांनी म्हटलंय.
 
पॉर्न फिल्म निर्मिती आणि प्रदर्शन केल्याच्या आरोपांवरून बिझनेसमन राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे ते पती आहेत.
 
याच प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव 'उमेश कामत' आहे. ही व्यक्ती राज कुंद्राची खासगी सहाय्यक (PA) म्हणून पूर्वी काम करत होती.
 
ही बातमी देताना काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी मराठी अभिनेता उमेश कामत यांचा फोटो वापरला.
 
ही बेजाबदार पत्रकारिता असल्याचं उमेश कामत यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणत नाराजी व्यक्त केली.
 
उमेश कामत यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
 
फेसबुक, इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये उमेश कामत म्हणतात, "आज राज कुंद्रा प्रकरणामध्ये चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी 'उमेश कामत' याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे.
 
या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन."
 
वृत्तवाहिन्यांनी हा फोटो वापरल्याचे स्क्रीनशॉट्सही उमेशने शेअर केले आहेत.
 
इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कॉमेंट करत पाठिंबा दिलेला आहे.
 
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनी म्हटलंय, "umesh.kamat आम्ही तुझ्याबरोबर आहोत...मी तुला लढ नाही म्हणणार.. आपण सगळे लढू असं म्हणेन...इतकी घाई??? इतका बेजबाबदारपणा?"
 
अमृता खानविलकर, प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, निखिल महाजन, अमृता सुभाष या सगळ्यांनीही उमेशला पाठिंबा दिलाय.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments