Festival Posters

येथे चालते केवळ हावभावांची भाषा

Webdunia
समोरच्या व्यक्तीसोबत आपण बोलून संवाद साधतो. काहीवेळा हातवारे व इशारा करूनही आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवता येते. पण ते प्रत्येकावेळी शक्य होईल, असे नाही. इंडोनेशियातील बेंगकला नावाच्या एका गावामध्ये फक्त इशार्‍यांची भाषा बोलतात. तोंडी संवाद अगदी क्वचित प्रसंगी साधतात. मागील सात पिढ्यांपासून या गावातील लोक असेच करत आहेत. फक्त गावामध्ये राहणारेच नाही तर तिथल्या विविध कार्यालयांमध्येही अशाच प्रकारे हावभाव करूनच कामे केली जातात. असे सांगितले जाते की या सांकेतिक भाषेला काटा कोलाक असे म्हणतात.
 
या गावातील लोक डीफ व्हिलेज नावानेही ओळखले जातात. बेंगकला गाव आणि तिथली कार्यालये सर्वत्र हातवारे करूनच लोक एकमेकांसोबत संवाद साधत असल्याने बाहेरुन येणार्‍या लोकांच्या ते डोक्यात शिरत नाही. त्यामुळे अन्य गावांतून तिथे फार कमी लोक येतात. परिणामी स्थानिक लोकांनाच तिथली सगळी व्यवस्था सांभाळावी लागते. बेंगकला गावातील काटा कोलोक सांकेतिक भाषा शेकडो वर्षापूर्वीची आहे. या गावातील बहुतांश लोकांना बोलण्या व ऐकण्याची समस्या आहे. अन्य ठिकाणांपेक्षा ही समस्या या गावात 15 पटीने जास्त आहे. त्यामुळे या लोकांनी एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी अशी इशार्‍याची भाषा विकसित केली आहे.
 
या गावातील अनेक मुले जन्मत:च ऐकण्या व बोलण्याच्या आजाराने ग्रस्त असतात. या समस्येसाठी तिथली भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओने 'नेशन-फर्स्ट एआय स्टॅक'ची रूपरेषा दिली

19 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

लोणावळा जवळील लोटस पॉइंट धबधब्यात अभियांत्रिकीचा विद्यार्थी बुडून मृत्यू

अजित पवारांच्या पायलटने जाणूनबुजून त्यांचे विमान कोसळवले, रोहित पवारने केला खळबळजनक दावा

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय खळबळ

पुढील लेख
Show comments