Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फुलका कठीण नसतोच मुळी.. कठीण असतो तो....

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (10:12 IST)
त्या दिवशी रात्री मी स्वैपाक करताना माझा 
छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. 
मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला 
आणि एकदा परतुन भाजून घेतला. 
तोवर दुसरा लाटून तयार होताच. 
एका हातात पकड घेऊन तवा उचलला 
आणि फुलका चिमट्याने त्यावर धरला, 
लगेच तो फुगून आला. 
मुलगा आश्चर्याने म्हणाला 
"झाला पण फुलका? 
ईतका सोप्पा ??"
 
मी म्हणाले 
"हो, कठीण नसतोच मुळी फुलका. 
खर तर सगळा स्वैपाकच मुळी 
सोप्पा असतो. 
कठिण असतं ते... 
तो रोज रोज करणे, 
दिवसातून 
अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे,
आपल्या मूड चा, मनःस्थिती चा,
 आजारपणाचा, दुखण्याचा 
कशाकशाचा 
विचार न करता अचूक आपली 
भूमिका निभावत 
भयंकर उकाड्यात देखील शेगडी जवळ 
न कंटाळता लढत देणे

सगळे संपले असे वाटत असतानाच 
ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून 
चार पोळ्या जास्त कराव्या लागणे, 
स्वैपाक घर आवरून ठेवल्यावर 
'संपली एकदाची दगदग आतापुरती' 
असे वाटत असतानाच... 
बैठकीतून ''आज जेवूनच जा' चा 
पुरुष मंडळींनी पाहुण्यांना केलेला आग्रह
हसून साजरा करणे
आणि तडक बिनपगारी overtime करणे
 
आणि हे करीत असताना 
प्रत्येकाची भाजी, तिखट, चटणी ची वेगळी आवड 
आणि तर्‍हा समजून त्यानुसार 
जास्तीत जास्त मने सांभाळत खपणे
 
बरे एवढे करून भागेल 
तर कसले स्वैपाकघर?
म्हणुन सगळा जिव निघून गेल्यावरही 
ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून 
पुन्हा लख्ख करून ठेवणे, 
ईतक्या मेहनतीला साधा कुणी 
thank you चा उच्चार ही न करता 
 
साधी पुढली ताट देखील न उचलता 
निघून जाणे 
भरीस भर म्हणून 
'ह्यात कोणते जग जिंकले?? 
स्त्रिया असतातच स्वैपाक आणि 
घरकाम करण्यासाठी टाइप' 
सामाजिक मान्यता असणे..

आणि हे सगळे शिकल्या सवरल्या 
स्त्रिया आहात
म्हणुन बँक, शाळा, 
नोकर्‍या, उद्योग, मीठ मसाला, 
नातेवाईक, 
सण समारंभ ईत्यादी व 
इतर अनेक गोष्टी जास्तीच्या सांभाळुन 
फिरून ओट्याशी दोन हात करीत 
न कुरकुरता उभे राहणे. 
 
कामवाल्या बाईला निदान पगार तरी देतात, 
घरच्या बाईला तर तेवढीही किम्मत नसते. 
अरे .. 
फुलका कठीण नसतोच मुळी.. 
कठीण असतो तो स्त्री जन्म ."

-सोशल मीडिया

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments