Dharma Sangrah

मुघलांनी धर्मांतरासाठी क्रूरतेची मर्यादा ओलांडली, पण प्रत्येक जखमेतून आवाज आली जय भवानी

Webdunia
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजेंनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोंकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच काही ग्रामीणांनी आपली समस्या राजेंसमोर मांडली, ज्यामुळे राजेंनी स्वत:जवळ केवळ 200 सैनिक घेऊन बाकी सेना रायगडला पाठवली. त्याचवेली गुपित रस्त्याने औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने 5000 सैन्यांसह संगमेश्वरावर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजेंना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले.
 
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. या दरम्यान औरंगजेबाने अमानवीयता आणि क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जीभ कापणे या सारख्या शिक्षा फर्मावल्या. औरंगजेबाने संभाजीराजेंना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली.बहादुरगडावर एका बोडक्या घाणेरड्या उंटावर साखळदंडाने बांधून संभाजी महाराजांना व कवी कलशांना उलटे बसवून मिरवले गेले होते.
 
तरीही संभाजीराजेंनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी त्यांच्या बलिदानापूर्वी औरंगजेबाने म्हटले की माझ्या चारी मुलांमधून एक जरी तुझ्यासारखा असता तर पूर्ण मुघलांनी संपूर्ण हिंदुस्तानावर राज्य केलं असतं.
 
सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments