Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World AIDS Vaccine Day जागतिक एड्स लसीकरण दिनाचे इतिहास आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 18 मे 2021 (10:44 IST)
दरवर्षी 18 मे हा जागतिक एड्स लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. एड्स लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. एड्ससारख्या रोगासाठी लसी शोधलेल्या शास्त्रज्ञांचे आभार मानण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. एड्स सारख्या आजरावर उपचार शक्य आहे लोकांना याबद्दल विश्वास ठेवणे आवश्यक आहे व या दिवशी विविध संस्था, चिकित्सक मिळून हेच काम करतात.
 
जागतिक एड्स लसीकरण दिनाचा इतिहास
1997 मध्ये 18 मे रोजी मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीत अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भाषण केले. त्याआधारे जागतिक एड्स लसीकरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भाषणातच त्यांनी येत्या दशकात लसांच्या माध्यमातून एड्स दूर करण्याविषयी बोलले होते. या भाषणानंतर संपूर्ण विश्वात लोकांना एड्सचे निर्मूलन केलं जाऊ शकतं या बद्दल खात्री देण्यात आली. लोकांमध्ये एड्सविषयी असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला गेला.
 
लसीमुळे मृत्यूदर कमी
80 च्या दशकात जेव्हा एड्सबद्दल माहिती मिळत होते तेव्हा येत्या दोन-तीन वर्षात मृत्यू व्हायची कारण हा व्हायरस सर्वात आधी व्यक्तीच्या लिंफेटिक सिस्टमवर हल्ला करतो. एचआयव्ही व्हायरस रोग-प्रतिरोधक क्षमतेला कमकुवत करतो. आत्तापर्यंत, एचआयव्हीचे कोणतेही औषध बनलेले नाही, परंतु लसीद्वारे त्याचे बचाव निश्चित केले जाऊ शकते.
 
अशाप्रकारे जागतिक एड्स लसीकरण दिन साजरा केला जातो
जागतिक एड्स लसीकरण दिनी वैज्ञानिक आणि डॉक्टर यांच्यात एड्स लस विषयी चर्चा होते.वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एड्स लसीचा इतिहास आणि त्याशी संबंधित महत्वाच्या गोष्टींबद्दल सांगितले जाते. येणा-या काळात लसीची शक्यता काय आहे, यावरही चर्चा केली आहे. लोकांमध्ये जागरूकता पसरवली जाते व त्यांना एड्स लसीचे महत्त्व सांगितले जातं.
 
एड्सचे लक्षणं
इतक्या वर्षांनंतरही लोकांमध्ये एड्स विषयी जागरूकता कमी आहे. लोकं याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. एड्सच्या लक्षणांमध्ये ताप, सुजलेल्या ग्रंथी, घसा खवखवणे, रात्री जास्त घाम येणे,स्नायू वेदना, डोकेदुखी, अत्यंत थकवा, शरीरावर पुरळ सामील आहे. या लक्षणांबद्दल वेळेवर डॉक्टरांशी संपर्क साधणे खूप महत्वाचे आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments