Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Recruitment in the health department आरोग्य विभागात बंपर भरती!

Webdunia
सोमवार, 15 मे 2023 (15:03 IST)
पुणे : राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट ‘क’ संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण 4751  पदांपैकी तब्बल चार हजार पदे परिचारिकांची असून त्यासाठी येत्या 25 मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत येणारी गट-क परिचर्या, तांत्रिक व अ तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व नियमानुसार लागू असणारे भत्ते दिले जाणार आहेत. रिक्त पदे सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत. 
अधिपरिचारिक पदांचे विवरण.. अधिपरिचारिकांची 3,974 पदे भरली जाणार असून त्यातील 1954  पदे खुल्या संवर्गासाठी आहेत. 
अनुसूचित जमातीसाठी 321 आणि अनुसूचित जातीसाठी 338 पदे तर उर्वरित पदे इतर संवर्गासाठी आहेत. 
इतर पदे...प्रयोगशाळा सहाय्यक 170, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 112, ग्रंथपाल 12, स्वच्छता निरीक्षक 9, ईसीजी तंत्रज्ञ 36,आहारतज्ञ 18 ,औषधनिर्माता 169 , कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार 19 , समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) 86  , ग्रंथालय सहाय्यक 16  , व्यवसायोपचारतज्ञ/ ॲक्युपेशनथेरपीस्ट7 , दूरध्वनी चालक 17 , महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख 05 , अंधारखोली सहाय्यक 10, किरण सहाय्यक 23, सांख्यिकी सहाय्यक 3 , शिंपी 15 , वाहन चालक 34 , गृहपाल 16 अशा विविध पदांची जाहिरात संचालनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

चटपटीत शिंगाड्याचे लोणचे रेसिपी

Amla During Periods मासिक पाळी दरम्यान आवळा खाऊ शकतो का? Amla पीरियड्सवर परिणाम करतो का?

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments