Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IDBI Bank SO Recruitment 2020: स्पेशलिस्ट ऑफिसरच्या भरतीसाठी अर्ज करा

Webdunia
सोमवार, 28 डिसेंबर 2020 (09:13 IST)
IDBI बँकेने असिस्टंट मॅनेजर ग्रेड -ए सह अनेक रिक्त पदांवर भरती काढली आहे. एकूण 134 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. उमेदवार ऑनलाईन आयडीबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर idbibank.in जाऊन 7 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेच्या अंतर्गत 62 भरती मॅनेजर ग्रेड बी, 52 पद एजीएस ग्रेड सी आणि 11 पदे डीजीएम ग्रेड डी आणि 9 पदे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए ची आहे. रिक्त जागा, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती खालील प्रकारे आहे.
 
असिस्टंट मॅनेजर(ग्रेड ए)-
पात्रता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री प्राप्त असावी. 
या सह फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट म्हणजे फसवणूक जोखीम व्यवस्थापन आणि सायबर क्राईम पात्रता असणाऱ्यांना प्राध्यान्यता दिली जाईल.
मॅनेजर ग्रेड बी -एकूण  52 पदे
पात्रता -  मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून B.E./B.Tech  इलेक्ट्रॉनिक्स,  इलेक्ट्रिकल टेली कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन MCA.
 
वयोमर्यादा - 
या साठी उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय 28 वर्ष असावे. 
कमाल वयोमर्यादांसाठी एससी/एसटी उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि ओबीसी प्रवर्गासाठी उमेदवारासाठी तीन वर्षाची सवलत देण्यात येईल. 
दिव्यांग प्रवर्ग अर्जदारांच्या वयो मर्यादेत दहा वर्षाची सवलत देण्यात येईल. 
 
अर्ज फी -
अनारक्षित आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 700 रुपये देय आहे. एससी एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना 150 रुपये द्यावे लागतील.
अर्जाची फी एसबीआय ई-पे च्या द्वारे ऑनलाईन क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे देय केली जाईल. 
 
निवड प्रक्रिया -
पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आणि मुलाखतीच्या माध्यमाने केली जाईल.
 
महत्त्वाच्या तारख्या -
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तिथी - 7 जानेवारी 2021 आहे.
 
अधिक माहितीसाठी येथे https://www.idbibank.in/pdf/careers/DetailedAdvertisementSpecialists2020-21.pdf क्लिक करा.
माहितीसाठी अधिकृत संकेत स्थळावर www.idbibank.in  क्लिक करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

अशा प्रकारे लसूण खा, आयुष्याभर कधीही आजारी पडणार नाही

अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

हिवाळा विशेष रेसिपी : टोमॅटो सूप

Career Tips: आरोग्य क्षेत्रात करिअर करून चांगला जॉब मिळवा

पुढील लेख
Show comments