Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी चित्रपटात 'फॉरेनची' नायिका

मराठी चित्रपटात   फॉरेनची   नायिका
Webdunia
PR
बॉलीवूडमधून कलाकारांची आयात-निर्यात नेहमीच सुरू असते. इथले कलाकार सातासमुद्रापार बनणार्‍या विदेशी चित्रपटांमध्ये चमकतात, तिथले कलाकार इथे येऊन पाहुणचार घेतात. हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावलेले आपले मराठमोळे कलाकारही हॉलिवूडमध्ये आपला झेंडा फडकवून येतात. पण मराठी चित्रपटांमध्ये विदेशी पाहुणे अभावानेच आढळतात. अशा वेळी युगोस्लाव्हियातील वांशिक संघर्षात होरपळून निघालेली एक क्रोएशियन युवती नाकात नथ, कपाळावर कुंकु, नऊवारी, कोल्हापुरी साज, तोडे अशा झोकदार पेहरावात पाटलीण बनून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सर्बियातील वांशिक यादवीमध्ये पदोपदी अवहेलना, परावलंबी जीणे अशा झळा सोसलेल्या बिलयाना रॅडोनिचचा संयुक्त राष्ट्रसंघ ते 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटातून मराठीच्या पडद्यापर्यंत झालेला प्रवास विलक्षण आहे. कथेच्या अनुषंगाने निर्मात्या संजीवनी गवई यांनी तिला या भूमिकेसाठी विनंती केली आणि ही क्रोएशियातून देशोधडीला लागलेली युवती चक्क कोल्हापूरजवळील इटकरे गावात आयुष्यात प्रथमच नऊवारी वगैरे नेसून

  शैक्षणिक प्राविण्यामुळे रोम आणि नंतर अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवणारी ती एकमेव युवती ठरली होती.      
कॅमेर्‍याला सामोरी गेली. 'मराठी कळणे मला अशक्य होतं. पण मी माझ्या भाषेत हे मराठी संवाद लिहून घेतले, शब्दांवर कुठे आघात करायचा, कशा ठसक्यात बोलायचं सारं समजावून घेतलं. प्रारंभी अवघड वाटलेलं सारं नंतर संजीवनी, दिग्दर्शक प्रदीप घोणसीकर, गिरीश परदेशी व सेटवरील सर्वांच्या सहकार्यामुळे सोपं होत गेलं. आपल्या मनाची तयारी असेल तर असाध्य वाटणार्‍या गोष्टीही आपण घडवून आणू शकतो हा अनुभव मला या मराठी चित्रपटाने दिलाय. फक्त आज एक सीन तर उद्या पटकथेतील दुसराच सीन यामुळे चित्रपटाची कथा मला शेवटपर्यंच कळली नव्हती,' असे बिलयाना सांगत होती.

शेतातलं नाचगाणं, शेण सारवणं, डोक्यावरून पदर घेणं, डोक्यात गजरा असे सारे बिलयानाने मनापासून एंजॉय केले असले तरी इथवरचा खडतर प्रवास ती विसरलेली नाही. त्याबद्दल बोलायलाही ती फारशी उत्सुक नसते. १९९१ च्या वांशिक संघर्षात सापडलेल्या बिलयानाच्या कुटुंबाने सर्बियातील तो काळ सर्वस्वी रेडक्रासच्या मदतीवर अवलंबून, पराकोटीची मानहानी, अपमान सहन करत काढला आहे.

PR
या परिस्थितीत शाळेतील दररोजची अवहेलना सहन करत जिद्दीने शिक्षण पूर्ण करणार्‍या बिलयानाने राष्ट्रसंघाच्या माध्यमातून दुभाषी म्हणून क्रोएशिया आणि कोसोव्हो येथील संघर्षग्रस्त सीमाभागात अनेक महिने काम केलं आहे. शैक्षणिक प्राविण्यामुळे रोम आणि नंतर अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवणारी ती एकमेव युवती ठरली होती. दुबईत स्थिरावलेली बिलयाना योगाभ्यासाच्या निमित्ताने गवई कुटुंबियांच्या संपर्कात आली आणि या योगायोगामुळेच तिच्या वाटचालीला मराठी पडद्याचे हे वळण मिळाले.

वांशिक यादवीच्या खुणा मनात आजही ताज्या असणार्‍या बिलयानाची मानसिक अस्वस्थता भारतीय अध्यात्म, योगसाधना, प्राणायाम यामुळे आता उणावली आहे. शांततेची पुरस्कर्ती असलेल्या बिलयानाची अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि शिर्डीच्या साईबाबांवर गाढ श्रद्धा आहे. विदेशातून आलेली एक युवती मराठमोळ्या ग्रामीण कुटुंबात सून म्हणून स्वतःला रुजवायचा प्रयत्न करते असे कथानक असलेल्या या चित्रपटातील बिलयानाची जेन तथा जानकी हे तिच्या प्रत्यक्षातील वाटचालीचे जणू एक रूप आहे.

ट्रॅक बदलण्याच्या प्रयत्नात गिरीश परदेशी
'फॉरेनची पाटलीण' कोल्हापूरात

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Bhadra Maruti : नवसाला पावणारा औरंगाबादचा भद्रा मारुती

रणवीर इलाहाबादिया झाला नॉट रिचेबल, मुंबई पोलिसांच्या संपर्काच्या बाहेर

विशाल ददलानीचा अपघात झाला, कॉन्सर्ट रद्द करावा लागला

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

Show comments