Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाणून घेऊ या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणातील 7 फरक

Webdunia
गुरूवार, 19 जानेवारी 2023 (08:06 IST)
आपणास माहीत आहे की स्वातंत्र्य दिन(15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी)रोजी ध्वजारोहण करण्यात काय फरक आहे? चला तर मग आम्ही सांगत आहोत की दोन्ही दिवसातील 7 फरक बद्दल. 
 
1 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या दिनी झेंडा खालून दोरीच्या साहाय्याने वर नेतात,नंतर उघडून फडकवतात.ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात, कारण हा 15 ऑगस्ट 1947 च्या ऐतिहासिक घटनेला सन्मान देण्यासाठी केला जातो. त्या कालीन पंतप्रधानांनी देखील त्यावेळी असे केले होते. घटनेत त्याला इंग्रजीमध्ये ध्वजारोहण ( Flag Hoisting )म्हणतात.  
26  जानेवारी प्रजासत्ताक दिनाला झेंडा वरच बांधतात, ज्याला उघडून फडकविले जातात घटनेत ह्याला झेंडा फडकविणे( Flag Unfurling) म्हणतात.
 
2 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारचे प्रमुख असलेले पंतप्रधान ध्वजारोहण करतात कारण स्वातंत्र्यदिनी भारतीय राज्य घटना अमलात आली नव्हती आणि राष्ट्रपती जे देशाचे संवैधानिक प्रमुख असतात, त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली नव्हती.  या दिवशी संध्याकाळी  राष्ट्रपती संपूर्ण देशाला आपला संदेश देतात. तर 26 जानेवारी  रोजी देशात राज्यघटनेच्या अमलबजावणी च्या स्मरणार्थ साजरा करतात. या दिवशी घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. 
 
3 स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तर प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण करतात. 
 
4 संपूर्ण भारतात प्रजासत्ताकदिन दणक्यात साजरा केला जातो पण स्वातंत्र्य दिनी असे काहीच घडत नाही.
 
5 प्रजासत्ताक दिनी देश आपले लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक गुणांना दाखवतात.परंतु स्वातंत्र्य दिनी असे काहीच घडत नाही. 
 
6 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन समारंभात प्रमुख पाहुणे येतात. परंतु स्वातंत्र्य दिनी असे काही होत नाही.
 
7 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दोन्ही राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन म्हणतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

चविष्ट व्हेजिटेबल सूप रेसिपी

हिवाळ्यात शरीराच्या या 4 अवयवांवर तूप लावा, तुम्हाला आरोग्यदायी फायदे होतील

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Winters : जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय ताबडतोब करून पहा

हिवाळ्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी या 5 हिरव्या भाज्या सुपर फूड आहेत

पुढील लेख
Show comments