Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रजननक्षमतेच्या विकासासाठी ''अन्न हे पूर्णब्रह्म''

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (10:01 IST)
तुम्हाला प्रजननक्षमतेची समस्या आहेत? मूल होण्याच्या तुमच्या स्वप्नाच्या मार्गात ती आड येत आहेत? ज्यामुळे तुमचे स्वप्न सत्यात उतरत नाहीय? करून देखील तुमचे स्वप्न साकार होण्यास अडथळे येतायत का? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर होय असतील, तर काळजी करू नका! हा लेख तुम्हाला तुमची प्रजनन क्षमता सुधारण्यास उपयुक्त अश्या खाद्यपदार्थांची माहिती प्रदान करणार आहे, जेणेकरून मूल होण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊन,तुमचे जीवन बदलून जाईल ! तसेच, तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि पालकत्वाचा गोड टप्पा अनुभवण्यास तुम्हाला मदत होईल.
 
आपण जे अन्न खातो, ते अन्न आपल्या आरोग्याशी निगडित महत्वाची भूमिका बजावत असतं. एका इंग्लिश म्हणीप्रमाणे ''यु आर व्हॉट यु इट'' म्हणजेच तुम्ही जे खाता तेच तुम्ही आहात ! म्हणून, आपण काय खातो, किती प्रमाणात खातो याकडे लक्ष ठेवणे गरजेचं आहे. अन्न हे पूर्णब्रह्म नुसार जर आपण योग्य पथ्यपाणी पाळल्यास, अन्न आपल्या एकंदरीत आरोग्याचे कल्याण करते. स्वाभाविकच, गर्भधारणेसाठी आवश्यक बीजांड आणि शुक्राणूंचे आरोग्य देखील ते निर्धारित करते. होय, काही पदार्थांचे सेवन केल्याने आपली प्रजनन क्षमता सुधारते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.
 
प्रजनन विकासासाठी आवश्यक खाद्यपदार्थ कोणते?
प्रजनन संबंधी उपचारांबरोबर तुमच्या दैनंदिन आहारात खालील पदार्थांचा समावेश केल्यास तुमची प्रजनन क्षमता सुधारू शकते, आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.
सूर्यफुलाच्या बिया (sunflower seeds):सूर्यफुलाच्या बी मध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे शुक्राणूंची संख्या सुधारण्यास मदत करते. सूर्यफुलाच्या बियांमध्ये फोलेट आणि सेलेनियम देखील असतात जे प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. त्याचे सेवन कसे करावे ? सूर्यफुलाच्या बिया असेच खाऊ शकतात किंवा तुम्ही ते तुमच्या जेवणासोबत घेऊ शकता. उदाहरणार्थ, सॅलडमध्ये त्याचा वापर करता येईल.

सिट्रस वर्गीय फळे: संत्र्यासारख्या सिट्रस वर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात पॉलिमाइन पुट्रेसिन आहे, जे बीजांड आणि वीर्य यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. 
त्याचे सेवन कसे करावे ?
सिट्रस वर्गीय फळे जसे की संत्री, मोसंबी, लिंबू सारखी फळे तुम्ही असेच खाऊ शकतात. किंवा ज्यूसच्या स्वरूपातही घेऊ शकता.

परिपक्व चीज: चेडरसारखे परिपक्व चीज शुक्राणूंचे आरोग्य सुधारू शकतात. परिपक्व चीजमध्ये पॉलिमाइन पुट्रेसिन असते जे बीजांड आणि शुक्राणूंचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
त्याचे सेवन कसे करावे ?
नाश्त्याला तसेच फळांबरोबर आपण परिपक्व झालेले चीज घेऊ शकता. मात्र, त्याची मात्रा मर्यादित असायला हवी, कारण जास्त चीज आरोग्यासाठी हानिकारक आहे. शेवटी, प्रत्येक गोष्ट नियंत्रणात असेपर्यंत सर्वकाही चांगले असते. कारण काय चांगले आणि काय वाईट यातील फरक मर्यादा ठरवते. मर्यादेची रेषा ओलांडली तर हीच चांगली गोष्ट वाईट बनते.

शिजवलेले टोमॅटो: टोमॅटोमध्ये लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते, जे पुरुष प्रजनन क्षमता वाढवण्यास आणि वीर्य आरोग्य सुधारण्यास मदत करते.
त्याचे सेवन कसे करावे ?
प्रजनन क्षमतेच्या विकासासाठी शिजवलेले टोमॅटो अधिक फायदेशीर आहेत. म्हणून, टोमॅटो सूप आणि सॉस यांसारखे शिजवलेले टोमॅटोचे खाद्यपदार्थ घेणे चांगले.

सोयाबीन आणि मसूर: मसूरमध्ये पॉलिमाइन स्पर्मिडीन मुबलक प्रमाणात असते, जे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते. मसूर आणि सोयाबीनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे निरोगी ओव्हुलेशन होते.
त्याचे सेवन कसे करावे ?
तुम्ही तुमच्या सॅलडमध्ये याचा समावेश करून खाऊ शकता.

डाळिंब: डाळिंब, अनेकांचे आवडते फळ आहे, यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊन प्रजनन क्षमता वाढते.
त्याचे सेवन कसे करावे ?
तुम्ही असेच डाळिंब घेऊ शकता किंवा ते दही आणि सॅलडमध्ये घालून त्याचे सेवन करू शकता.

अक्रोड: अक्रोड शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. अक्रोड शुक्राणूंची गती आणि आकारमान सुधारते.
त्याचे सेवन कसे करावे?
तुम्ही रेग्युलर स्नॅक म्हणून अक्रोड खाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आईस्क्रीममध्ये अक्रोड देखील घालू शकता.

अंड्यातील बलक: अंड्यातील पिवळा बलक किती फायदेशीर आणि आरोग्यदायी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मुंबईतील बहुतांश लोकांच्या आहारात तो एक महत्त्वाचा भाग आहे. अंड्यातील पिवळा बलक प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी देखील फायदेशीर असतो. हे खूपच कमी लोकांना माहिती असेल की, अंड्यातील पिवळा बलक स्त्रियांमध्ये निरोगी अंडी आणि प्रजनन क्षमता सुधारतात.
त्याचे सेवन कसे करावे?
तुमच्या आवडीप्रमाणे अंडी तळून किंवा उकडून खाऊ शकता. पण त्यात पिवळा बलक असल्याची खात्री करा.

अननस: अननसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. अननसमध्ये ब्रोमेलेन देखील असते, हे एक नैसर्गिक एन्झाइम तत्व आहे, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला दाहक अवस्थेपासून परावृत्त करते. जळजळ करणारे पदार्थ प्रजननक्षमतेसाठी हानिकारक असतात.
त्याचे सेवन कसे करावे?
अननस तुम्हाला हवे तसे खाऊ शकता पण ते ताजे असल्याची खात्री करा.

-Dr Hrishikesh Pai

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Face Beauty Tips : चेहऱ्यावर पिंपल असेल तर हे करा

गरोदरपणात पोहे खाल्ल्याने मिळतील हे 5 आरोग्य फायदे, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments