Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावध! Corona Vaccine संसर्गापासून संरक्षण देत नाही, परंतु ...

Webdunia
रविवार, 18 एप्रिल 2021 (11:46 IST)
आरोग्य व विकास अर्थशास्त्रज्ञ प्रा. अनूप मलानी यांनी सांगितले की कोरोना व्हायरस (Coronavirus) कोविड-19 लस कोणत्याही व्यक्तीला संसर्गापासून संरक्षण देत नाही परंतू आजाराचे जलद निराकरण आणि याचे गांर्भीय कमी करण्यास मदत करतं. त्यांनी हे देखील म्हटले की देशात संसर्गाच्या प्रकरणात झालेल्या वाढीमागे पुन्हा संक्रमण हे एक कारण असू शकते.
 
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो लॉ स्कूल आणि विद्यापीठाच्या प्रिझ्कर स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर मलानी भारताच्या शहर आणि राज्यांत आर्थिक विकास-केंद्रित थिंक-टँक आयडीएफसीसह कोविड-19 सीरो सर्व्हे साखळीचे नेतृत्व करत आहे.
 
मलानी यांनी म्हटले की मला भीती आहे की ही भारत आणि इतर देशांमध्ये देखील सर्वात मोठी गैरसमज आहे. मुदतीपूर्वी संक्रमण आणि लस आपल्याला संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करत नाहीत. प्रतिकारशक्ती या मार्गाने कधीच कार्य करत नाही. त्याऐवजी, नैसर्गिक आणि लस रोग प्रतिकारशक्ती उपयुक्त आहे. कारण एकदा त्याचा संसर्ग झाल्यास, तो आपल्याला त्वरीत संसर्ग बरा करण्यास मदत करतो.
 
त्यांनी म्हटले की याचे दोन फायदे आहे- ही लसमुळे आपल्याला संसर्गामुळे मृत्यू किंवा इतर गंभीर आरोग्य नुकसान टाळण्यात मदत होते आणि आपल्यामुळे दुसर्‍यास लागण होण्याची शक्यता कमी करण्यास देखील मदत करते. म्हणूनच पुन्हा संसर्ग होणे शक्य आहे, परंतु संक्रमणाचे नुकसान कमीतकमी होईल.
 
मलानी यांनी म्हटले की लोकसंख्येमध्ये पुन्हा संक्रमणाची पातळी, संक्रमण आणि रोग प्रतिकारशक्तीचा प्रसार- नैसर्गिक किंवा लस प्राप्त यावर अवलंबून आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) चे महानिदेशक बलराम भार्गव यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं की पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणे एक टक्क्यांच्या आसपास आहेत.
 
त्यांनी म्हटलं होतं की आम्ही भारतात पुन्हा संसर्ग प्रकरणांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे, पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणे एक टक्क्यांच्या आसपास आहेत. भारत कोविड-19 प्रकरणांमध्ये प्रचंड वाढीसह झटत आहे. मलानी यांनी म्हटलं की नुकत्याच झालेल्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे दोन शक्यता असू शकतात- पहिलं लोक मास्क घालत नसून एकाच ठिकाणी एकत्र होत आहे आणि दुसरं कोरोना व्हायरसचे नवीन वेरियंट दिसून येत आहे. दूसर्‍या लाटीला हाताळण्यासाठी मलानी यांनी म्हटलं की मास्क लावणे, अधित तपासण्या, रुग्णांच्या बरं होणे किंवा मृत्यूवर नजर ठेवणे आणि संसर्ग प्रकरणांची क्रमवारी 
 
लावणे हे प्रकरणांच्या वाढीस सामोरे जाण्याचे मार्ग असू शकतात. आरोग्य व विकास अर्थशास्त्रज्ञ यांनी म्हटलं की रोग प्रतिकारशक्ती पातळी वाढवणे, समारंभ सारखे क्रियाकलाप कमी करण्यापेक्षा चांगले आहे. कारण त्यांना आता भीती आहे की लोक आता लॉकडाऊनचे कमी अनुपालन करतात.
 
त्यांनी म्हटलं की गर्दी थांबविणे हे ध्येय असावं, जेव्हाकि संक्रमित व्यक्तीस शोधून काढणे आणि त्यांचे पृथक्करण करणे उपयुक्त आहे. देशव्यापी लॉकडाऊन विषयी मलानी म्हणाले की लॉकडाउन श्रीमंतांपेक्षा गरिबांचे अधिक नुकसान करते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पुढील लेख