Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय अवलंबवा

Webdunia
शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (14:03 IST)
अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा छातीत जळजळ सुरू होते. ही एक सामान्य समस्या आहे जी बऱ्याच लोकांना त्रास देते. वास्तविक, अन्न पचनाच्या प्रक्रियेत, आपले पोट असे ऍसिड तयार करते जे अन्न पचण्यास मदत करते. पण कधी कधी हे अॅसिड जास्त प्रमाणात तयार होते त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. यासाठी लोक सहसा औषधे घेतात. पण काही घरगुती उपायांनीही आपण छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करू शकता. अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत .चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 आलं - पोटाच्या जळजळीत आल्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. जेवल्यानंतर  छातीत जळजळ होण्याची तक्रार असल्यास, जेवणानंतर आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा आल्याचा चहा बनवून प्या. यामुळे छातीत जळजळ होण्यापासून लवकर आराम मिळेल. 
 
2 ओवा  - अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ झाल्यास आपण ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. यासाठी एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गॅसवरून काढून थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर त्यात काळे मीठ टाकून प्या. असे केल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून लवकरच सुटका होईल.
 
 3 ऍपल सायडर व्हिनेगर - ऍपल सायडर व्हिनेगर हा देखील छातीत जळजळ दूर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. याच्या सेवनाने पोटातील ऍसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून प्या. 
 
4 गूळ - जेवणानंतर गोड म्हणून गूळ दिला जातो . गूळ आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हे पचन प्रक्रियेला गती देते आणि पोटात ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करते. जर आपण अॅसिडिटीच्या समस्येने हैराण असाल तर जेवणानंतर थोडा गूळ खाऊन एक ग्लास पाणी प्या.
 
5 कोरफड - कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे माहिती असेलच. पोटाशी संबंधित समस्यांमध्ये कोरफडीच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरते. छातीत जळजळ होत असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी एक चतुर्थांश कोरफडीचा रस प्या.
 
6 ज्येष्ठमध - आयुर्वेदात ज्येष्ठमध हे अत्यंत फायदेशीर औषध मानले जाते. छातीत जळजळ होण्याच्या समस्येवर ज्येष्ठमधचे सेवन केल्याने लगेच फायदा होतो. यात अनेक आयुर्वेदिक घटक असतात जे छातीत जळजळ दूर करण्यास मदत करतात. ज्येष्ठमध बारीक करून बारीक भुकटी  बनवा आणि त्याचे नियमित सेवन करा. असे केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होईल. 
 
7 तुळस - तुळशी नैसर्गिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तुळशीला अनेक रोगांवर रामबाण औषध मानले जाते. छातीत जळजळ होत असेल तर सकाळी उठून तुळशीची काही पाने चावा. यामुळे  पोट दिवसभर थंड राहते आणि गॅस किंवा जळजळ होण्याची कोणतीही तक्रार होणार नाही.
 
8 लिंबू - लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. छातीत जळजळ होत असल्यास लिंबू आणि काळे मीठ पाण्यात मिसळून प्या. यामुळे पित्ताचा रस तयार होतो, जो अन्न पचवण्याचे काम करतो. असे केल्याने छातीत जळजळ होणार नाही.
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात तुमच्या नखांना स्टायलिश लुक द्या, या उपयुक्त नेल आर्ट टिप्स फॉलो करा

ही गोष्ट दह्यात मिसळून प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेवर चमकही येते

पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग

जातक कथा: लखन मृगाची गोष्ट

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी पेढा

पुढील लेख
Show comments