rashifal-2026

कमी रक्तदाबावरचे घरगुती उपाय!

Webdunia
च्चरक्तदाबाप्रमाणे कमी रक्तदाब हासुद्धा एक विकार आहे आणि तोही तितकाच गंभीर आहे. धमन्यांमधून वाहणार्‍या रक्ताचा दाब कमी होणं म्हणजे कमी रक्तदाब. तुमचा रक्तदाब 90/60 किंवा यापेक्षा कमी भरत असेल तर कमी रक्तदाबाची समस्या असू शकते. कमी रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तीच्या मेंदूला आणि इतर अवयवांना रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा न झाल्यानं भोवळ, चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.  
 
कमी रक्तदाबाची कारणं 
भरपूर घाम आल्याने किंवा जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होणे, उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांवर घेतली जाणारी औषधं, गंभीर स्वरूपाचा जंतूसंसर्ग, हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणं, गरोदरपणा, मुर्च्छा ही कमी रक्तदाबामागील महत्त्वाची कारणं आहेत. 
 
घरगुती उपाय 
कमी रक्तदाबाच्या समस्येवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेण्यासोबतच काही घरगुती उपायही करता येतात. 
 
* 30 ते 32 बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे बेदाणे चावून चावून खा. बेदाणे भिजवलेले पाणीही प्या. 
 
* 7 ते 8 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बदाम सोलून वाटून घ्या. वाटलेले बदाम एक ग्लास दुधात घालून दूध गरम करा. गरम दूध घ्या. 
 
* तुळशीच्या 10 ते 15 पानांचे तुकडे करून एका कपड्यात बांधून ठेवा. सकाळी उठल्यावर ही पानं एक चमचा मधात घालून हे मिश्रण खा. यानी नक्कीच मदत मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Mahatma Gandhi Punyatithi 2026 Speech in Marati महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी

बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासोबतच CUET ची तयारी कशी करावी?

Marathi Essay प्लास्टिकमुक्त भारत: एक संकल्प की केवळ घोषणा?

Kashmiri Pulao Recipe घरीच बनवा हॉटेलसारखा सुगंधी काश्मिरी पुलाव

फक्त 7 दिवस सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या; शरीरातील बदलांमुळे थक्क व्हाल!

पुढील लेख
Show comments