Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लेझिम चाले जोरात

लेझिम चाले जोरात मराठी कविता
Webdunia
सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (14:49 IST)
दिवस सुगीचे सुरु जाहले, 
ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम चाले जोरात!
चौघांनी वर पाय ऊचलले,
सिंहासनीं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले...
ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात!
दिवटी फुरफुर करू लागली, 
पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम चाले जोरात!
भरभर डफ तो बोले घुमुनीं, 
लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम चाले जोरात!
डफ तो बोले-लेझिम चाले, 
वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले...,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम गुंगे नादात्!
सिंहासन ते डुलु लागले,
शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,लेझिम गुंगे नादात्!
दिनभर शेती श्रमूनी खपले, 
रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले...,
छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !
पहाट झाली - तारा थकल्या,
 डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां...,
छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!
 
कवी-श्रीधर बाळकृष्ण रानडे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

स्पाइसी गार्लिक बटर चिकन रेसिपी

पौष्टिक मेथीचे पराठे रेसिपी

मधुमेहाव्यतिरिक्त, जास्त गोड खाल्ल्याने देखील होतात हे 7 आजार

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरण्याऐवजी या गोष्टी खा

पुढील लेख
Show comments