Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

How To Store Flour: गव्हाच्या पिठाला कीड लागू नये,या टिप्स अवलंबवा

Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2023 (15:15 IST)
प्रत्येक घरातील आहारात पोळी खाणे हे ठरलेले असते. मात्र, दर इतर दिवशी बाजारातून पीठ घेणे अवघड झाले आहे. म्हणूनच बहुतेक लोक पीठ साठवतात. जेणेकरून दररोज पीठ विकत घ्यावे लागणार नाही. पण पिठात किडे पडल्याने लोकांना ते जास्त काळ साठवता येत नाही. पण काही सोप्या युक्त्या अवलंबवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ पीठ साठवू शकता. तसेच, पीठ जास्त काळ ताजे ठेवू शकता.
 
कंटेनरमध्ये पीठ ठेवा
बहुतेक लोक प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा गोण्यांमध्ये पीठ साठवतात. पण पीठ जास्त काळ साठवून ठेवणे योग्य नाही. पीठ अशा प्रकारे ठेवल्यावर त्यात ओलावा येतो. तसेच, ते लवकर खराब होते.गव्हाचं पीठ अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या डब्यात जास्त काळ साठवून ठेवावा. पीठ साठवण्याआधी, ते काही काळ सूर्यप्रकाशात ठेवणे आवश्यक आहे.
 
गव्हाच्या पिठात मीठ घाला-
कीटकांना पिठापासून दूर ठेवण्यासाठी मीठ चांगले काम करते. पिठाच्या प्रमाणानुसार त्यात 1 किंवा 2 चमचे मीठ टाकून ते एका डब्यात साठवावे. यामुळे साठवलेले पीठ महिनोमहिने ताजे राहते.
 
तमालपत्र टाकून ठेवा -
जर तुम्हाला पीठ जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यात मीठ घालायचे नसेल तर तुम्ही त्याऐवजी तमालपत्र देखील वापरू शकता. तमालपत्राचा वास खूप तीव्र असतो हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे पिठात किडे येत नाहीत. तुम्ही ज्या डब्यात पीठ साठवत आहात, त्यात 5-6 तमालपत्र टाका. यामुळे तुमचे पीठ जास्त काळ ताजे राहील.
 
फ्रीज मध्ये साठवा
पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येत नाही. पण तरीही तुम्ही पीठ किड्यांपासून वाचवण्यासाठी आणि ताजे ठेवण्यासाठी फ्रीज वापरू शकता. पीठ रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. ओलावा पोहोचणार नाही याची काळजी घ्या. कारण आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर ते खराब होऊ शकते.
 
या गोष्टींची विशेष काळजी घ्या
जर तुम्ही मोठ्या प्रमाणात पीठ विकत घेत असाल तर त्याची गुणवत्ता आणि कालबाह्यता तारीख तपासण्यास विसरू नका. कारण खूप जुने पीठ जास्त काळ साठवता येत नाही. खूप जुन्या पिठात कृमी दिसू लागतात. एक महिन्यापेक्षा जुने पिठाचे पाकीट खरेदी करू नये.

Edited By -Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments