Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips:रागावलेल्या जोडीदाराला मनवण्यासाठी या युक्त्या अवलंबवा , प्रेम अधिक वाढेल

Webdunia
शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (22:04 IST)
जिथे प्रेम आहे तिथे राग, रुसणे आणि मनवणे असते. अनेकदा नात्यात आपला  पार्टनर आपल्यावर रागावतो, त्याला असे वाटते की आपण त्यांला मनवाल  तुम्ही जोडीदाराची नाराजी आणि राग योग्य वेळी आणि योग्य मार्गाने दूर केला नाही तर प्रकरण आणखी बिघडू शकते. पती-पत्नी किंवा प्रेमी युगुल एकमेकांकडे वारंवार तक्रार करतात .याची अनेक कारणे असू शकतात, कदाचित कामामुळे आपण  त्यांना वेळ देऊ शकत नाही .अशा परिस्थितीत एकमेकांपासूनचे अंतर वाढू लागते. प्रेम आहे तर राग आणि रुसवे फुगवे असणारच. नात्यात दुरावा कमी करण्यासाठी आणि आपसात प्रेम वाढविण्यासाठी या काही टिप्स अवलंबवा.
 
1 थोडा वेळ एकांतात घालवा- बहुतेक नात्यांमध्ये अंतर येण्याचे एक कारण म्हणजे जोडीदाराला पुरेसा वेळ न देणे. अनेकदा भांडण झालं की आपला पार्टनर आपल्याकडे तक्रार करतो की आपण त्यांना वेळ देत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत काही दर्जेदार वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. जोडीदारासोबत लांब सुट्टीवर जा किंवा लाँग ड्राईव्हला जा. या दरम्यान जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवा. त्यांच्याशी बोला आणि त्यांचे म्हणणे ऐका आणि समजून घ्या. जेणेकरून आपसातील दुरावा कमी होऊन प्रेम वाढेल. 
 
2 जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू आणा - नात्यात नवीनता आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमधून जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. या साठी आपण  त्यांची वेळोवेळी स्तुती करू शकता. आपण जोडीदाराला खास वाटण्यासाठी मिठी मारा. त्यांना त्यांच्या कामात मदत करा. आपण त्यांच्यासाठी जेवणात काहीतरी खास बनवू शकता.
 
3 एक सरप्राईज गिफ्ट द्या- आपल्या भावना व्यक्त करण्याचा गिफ्ट हा एक उत्तम मार्ग आहे. प्रत्येकाला भेटवस्तू आवडतात. अशा वेळी कोणत्याही खास प्रसंगाची वाट पाहू नका, तर त्यांना वेळोवेळी सरप्राईज गिफ्ट द्या. भेट महाग नसेल पण आपल्या जोडीदाराला नक्कीच आवडेल.
 
4 रिलेशनशिपमध्ये स्पेस ठेवा -रिलेशनशिप मजबूत ठेवण्यासाठी आपण आपल्या  पार्टनरला थोडी स्पेस देणं गरजेचं आहे. यांच्यावर जास्त मर्यादा घालू नका. त्यांच्यावर विश्वास ठेवा. आपल्या जोडीदाराचे स्वतःचे सामाजिक सर्कल, मित्र असू शकतात. त्याला देखील त्यांच्यासोबत वेळ घालवायचा असेल. आपण लावलेले  प्रतिबंध आपल्या दोघांमधील असलेल्या नात्यात दुरावा आणू शकतात. असं करून आपले संबंध खराब करू नका.आपण जोडीदाराचे चांगले मित्र व्हा.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी या 5 हिरव्या भाज्या सुपर फूड आहेत

अग्निसार प्राणायाम केल्याने बद्धकोष्ठता, लठ्ठपणा यासह सर्व आजार बरे होतात

नैतिक कथा : हत्ती आणि सिंहाची गोष्ट

Quick Recipe : अंड्याचा पराठा

3 Warning Signs of Heart Attack या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमचा जीव जाऊ शकतो

पुढील लेख
Show comments