suvichar

आता मी पाहुणी आहे....

Webdunia
गुरूवार, 10 जून 2021 (10:41 IST)
मंगळसुत्र आणि जोडवे 
या सगळ्यांमुळे नाही..
तर भरलेल्या बॅगमुळे 
परके वाटते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आई म्हणते अगं 
हे बॅगमध्ये लगेच भर 
नाहीतर जाताना विसरशील, 
प्रत्येकवेळी काहीना काही विसरते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
माहेरी येण्याआधीच 
परत जाण्याच्या बसचे 
तिकीट बुक असते, 
किती जरी सुट्टी असली 
तरी ती कमीच पडते..
वाळुसारखी माहेरपणाची 
वेळ निसटून जाते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आता परत कधी येणार ?
हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून 
वाईट वाटते, 
मन आतल्या आंत रडू लागते.. 
मग जबाबदारीची जाणीव होऊन 
पुन्हा शहण्यासारखे वागते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
माझ्या माहेरच्या खोलीचा 
कोपरा अनं कोपरा 
फक्त माझा आणि 
मी म्हणेल तसा असायचा 
पण आता पंखा आणि 
दिवा लावताना सुद्धा 
बटणाचा गोंधळ उडतो.. 
प्रत्येक क्षण आता 
मी पाहुणी आहे 
हे जाणवुन देतो..
 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
शेवटच्या दिवशी घरातुन निघतांना 
आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही 
कारण तसं केलं तर कधीच
मी जाऊ शकणार नाही..
मग तसंच पाणवलेले डोळे 
आणि गच्च भरलेली  
बसमध्ये बसावे लागते, 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
४ दिवसांची माहेरपणाची सुट्टी 
संपलेली असते..
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे 
आपापल्या घरी जावे लागते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..         
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya festival Special अक्षय तृतीयेला अश्या प्रकारे बनवा 'परफेक्ट' शाही आम्रस

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कारणे आणि उपचार जाणून घ्या

Career BE Mining Engineering: बीई मायनिंग इंजिनीअरिंग कोर्स करिअर, स्कोप जाणून घ्या

हा एक ग्लास ज्यूस त्वचेवरील निस्तेजपणा आणि सुरकुत्या दूर करेल

या चुकांमुळे मायग्रेनची वेदना वाढू शकते! अशा वेळी काय करावे हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments