निरोप शब्द उच्चारता थोडं जड जातं, काहीतरी सुटलं हातून, मनी पक्क होतं, सोडावस वाटत नाही ते, पकडून ते ठेवावं वाटत, घट्ट मिठीत आपल्या, जखडून राहावंसं वाटत, जसं कळतं निरोपाची वेळ जवळ आलीय, इथलं अस्तित्व संपून, निघण्याची घडी झालीय, सावरासारव करायला हवी पसाऱ्याची , सोडवणूक करायला हवी, गुंतलेल्याची, सोप्पं व्हायला लागतं...