rashifal-2026

कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात

Webdunia
मंगळवार, 4 जानेवारी 2022 (14:59 IST)
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात,
आपलं माणूस चुकतो, जाणीवही असते, पण दुसऱ्या समोर, चुका दाखवायच्या नसतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात,
खूप मोठा आव आणतात काही,पण पितळ उघडे पडतं, अश्या वेळी त्या झाकून न्यायच्या असतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात,
तिरिमिरीत काहीबाही बोलले जातं, जिव्हारी घाव बसतो,पण ऐन वेळी गोड बोलून निभवाव्या लागतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून न्याव्याच लागतात,
अधुर राहतं काम कुणाचं, वेळी च पूर्ण होत नाही, त्या पूर्ण भासवाव्या लागतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात!
जे गात राहवंच लागतच,यालाच तर जीवन गाणे म्हणतात, भूमिका सकाराव्याच लागतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्या च लागतात!!!
....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

मजबूत आणि लांब केसांसाठी 5 सर्वोत्तम जीवनसत्त्वे जे चमत्कार करतील, फायदे जाणून घ्या

Winter Health Tips: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या 5 गोष्टी खा

नवीन वर्षात प्रेयसीला भेट देण्यासाठी काय विचार केला? नसेल केला तर नक्की बघा

हिवाळ्यात आता गाजर हलवा नको, तर चविष्ट गाजर गुलाब जामुन बनवा

यकृत खराब होण्याच्या 3 महिने आधी शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा

पुढील लेख
Show comments