Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बहुगुणी व्यक्तिमत्व असणारे असे प्रह्लाद केशव अत्रे "आचार्य अत्रे"

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (12:14 IST)
मराठी जगातील नावाजलेले सर्वांचे लाडके लेखक, नाटककार, संपादक, पत्रकार मराठी, हिंदी चित्रपट निर्मिते शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते असे बहुमुखी व्यक्तिमत्त्वाचे धनी असे प्रह्लाद केशव अत्रे म्हणजे आपले सर्वांचे आचार्य अत्रे यांचा जन्म पुरंदर तालुक्यात असलेल्या कोडीत खुर्द या गावात 13 ऑगस्ट 1889 रोजी झाला. यांचे वडील केशव विनायक अत्रे आणि आई अन्नपूर्णा बाई केशव अत्रे. 
 
आचार्य हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्तव मानले जाते. त्यांनी पुणे आणि लंडन येथे उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांनी मुंबईत एका हायस्कूल मध्ये इंग्रजी आणि गणित शिकवले. त्याशिवाय त्यानी वर्ग शिक्षक, संस्कृत शिक्षक तसेच मुख्याध्यापक म्हणून देखील नोकरी केली. मुख्याध्यापक म्हणून त्याची शाळेचा विस्तार देखील केला. आपल्या नाट्य लेखनाची सुरवात इथूनचं केली. मुबईतील सरकारी ट्रेनींग कॉलेजातून शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी टी परीक्षेत प्रथम आले नंतर त्यांनी 1927 ते 1928 दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळविला. ह्यांनी पुण्यात धनराज गिरजी आणि मुलींच्या आगरकर हायस्कूल ची स्थापना केली. 
 
महाराष्ट्रच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते प्रमुख नेते होते. त्यांचा अथक प्रयत्नांमुळे संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे म्हणतात. ते कुशल वक्ते होते आपल्या वक्तृत्वाने ऐकणारे श्रोतांना भारावून टाकायचे. काही काळासाठी ते महाराष्ट्र विधानसभेतील आमदार होते. ते सामाजिक बांधिलकी, गोरगरीब, तळागाळातील माणसे, उपेक्षित दलितांचे कैवारी होते. 'आचार्य' म्हणून पदवी त्यांना प्राप्त झाली. त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असे म्हणून वर्णिले असे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांनी 22 अशी गाजलेली नाटकं लिहिली. त्या मध्ये काही गाजलेले नाटक म्हणजे साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, तो मी नव्हेच, त्यांनी अध्यापन मासिके तसेच रत्नाकर, मनोरमा, नवे अध्यापन, इलाखा शिक्षक मासिके काढली, त्यानी नवयुग साप्ताहिक सुरु केले होते जे त्यांचा मृत्यू नंतर बंद पडले. यांचा मृत्यू 13 जून 1969 रोजी झाली. 
 
आचार्य यांना मिळालेले पुरस्कार -
* विष्णुदास भावे यांचा स्मृती प्रित्यर्थ विष्णुदास भावे पुरस्कार.
* त्यांना जास्त पुरस्कार मिळाले नसून त्यांचा नावाने आचार्य अत्रे पुरस्कार दिले जातात. 
 
त्यांनी नाटके, काव्य, आत्मचरित्र, कथासंग्रह, कादंबऱ्या, बऱ्याच लिहिल्या आहेत. त्यांचा साहित्य खजिनापैकी तो मी नव्हेच, मोरूची मौसी, झेंडूची फुले, कावळ्यांची शाळा, कऱ्हेचे पाणी, मोहित्यांचा शाप आणि बरेच आहे. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले. 
 
त्यांनी विविध क्षेत्रात तोलामोलाची कारागिरी केली असे व्यक्ती फार कमी असतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीने मराठी माणसाच्या मनावर ठसा उमटविला आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments