Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पांढरे कपडे धुण्याची डोकेदुखी आता विसरा

Webdunia
शनिवार, 11 एप्रिल 2020 (15:23 IST)
पांढरे कपडे प्रत्येकाला घालाला आवडतात. कारण पांढरे कपडे घातल्यावर तुमचा लूकच बदलतो. मग ते ऑफिसला जाताना कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट असो वा तुमच्या मुलाचा युनिफॉर्म किंवा तुमचा आवडता पांढरा कुर्ता. पण प्रश्न असतो ते घातल्यावर जपायचा. कारण ज्या दिवशी आपण पांढरे कपडे घालतो तेव्हा नेमका त्यावर डाग पडतो. मग आठवते तो आईचा ओरडा. पण लग्न झालं असेल तर डाग लागलेले पांढरे कपडे स्वतःच धुवायला लागतात. मोठीच समस्या असते नाही का? एवढंच नाहीतर कधी कधी पांढरे कपडे धुतल्यावर निस्तेजही वाटू लागतात. पण आता नो प्रोब्लेम. तुमच्यासाठी  काही टिप्स. ज्या वापरून तुम्ही पांढरे कपडे धुतल्यास ते राहतील पांढरे शुभ्र.
पांढरे कपडे नेही इतर कपड्यांपेक्षा वेगळे ठेवा.
पांढर कपड्यांना लगेच दुसरा रंग लागतो.
त्यामुळे ते इतर कपड्यांपासून वेगळेच ठेवावे.
सर्वात आधी कपडे धुवाला घेतलवर पांढरे कपडे धुवावे. नंतर इतर रंगाचे कपडे धुवावे.
ओव्हर-लोडिंग टाळा
कोणत्याही वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुवायला टाकू नका. असं केल्याने मशीनमध्ये कपडे व्यवस्थित धुतले जात नाहीत. ज्यामुळे कपड्यातील घाण तशीच राहते. पांढरे कपडे धुताना या गोष्टींची काळजी आवर्जून घ्या.
कोमट पाण्याचा वापर
पांढर्‍या रंगाचे कपडे कधीही कोमट पाण्याने धुतल्यास जास्त स्वच्छ निघतात. अशा पाण्याने  कपडे धुतल्याने तेलाचे डाग किंवा कपड्यांची दुर्गंधी लगेच दूर होते.
व्हिनेगरचा वापर
पांढरे कपडे धुतल्यानंतर ते व्हिनेगर घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवल्याही त्याची दुर्गंधी नाहीशी होते.
बेकिंग सोडा आणि लिंबू
पांढरे कपडे धुताना तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापरही करू शकता. पांढरा शुभ्र रंग कायम राहण्यासाठी पांढरे कपडे धुण्याआधी ते लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात भिजवा आणि मग धुवा. तसंच तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घातलेल्या पाण्याने पांढरे कपडे धुतल्यासही ते पांढरेशुभ्र निघतील.
कपडे तपासा
तुम्ही जर पांढरे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले असतील तर ड्रायरमध्ये सुकवण्याआधी ते एकदा तपासा. जर कपड्यांमध्ये कुठे डाग दिसल्यास ते पुन्हा धुवा. जर डागासकट तसेच कपडे धुतल्यास त्यवरील डाग कायम राहील.
डिटर्जंट
पांढरे कपडे धुण्यासाठी नेहमी योग्य डिटर्जंट पावडर निवडा. याशिवाय कपडे धुताना त्यात योग्य प्रमाणात डिटर्जंट घालणंही आवश्यक आहे. जास्त प्रमाणात डिटर्जंट घातल्यासही कपड्यांवर डाग पडू शकतात. तसंच कपडे निस्तेजही दिसू शकतात.

मग अशाप्रकारे तुम्ही तुमच्या पांढर्‍या कपड्यांची काळजी घेतल्यास त्यावर कधीच डाग पडणार नाहीत आणि ते स्वच्छ पांढरे शुभ्र दिसतील.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments