Festival Posters

व्हाईट डिस्चार्जचा त्रास होत आहे, तर मग हे करून बघा

Webdunia
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (10:00 IST)
प्रत्येक बाईला पांढऱ्या स्त्रावाचा समस्येतून जावं लागतं. ही समस्या किंवा हा त्रास एक अतिशय सामान्य बाब आहे. जर आपण देखील या त्रासाशी झुंजत आहात तर आम्ही इथे आपल्याला काही घरगुती उपाय सांगत आहोत, जे उपाय आपण केल्यानं एका आठवड्यातच आपल्याला या त्रासापासून सुटका मिळू शकते. मुख्य म्हणजे की आपल्याला हे उपाय केल्यानं काहीही दुष्परिणाम होणार नाही.
 
सरत्या वयात बायकांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. अश्या बऱ्याच समस्या असतात ज्या आपण कोणाला ही सांगू शकत नाही. त्याबद्दल बोलू शकत नाही. ज्याबद्दल बोलल्यावर देखील अस्वस्थता जाणवते. अश्याच काही त्रासांपैकी एक आहे ते म्हणजे ल्युकोरिया. याला पांढरे पाणी, व्हाईट डिस्चार्ज किंवा श्वेत प्रदर देखील म्हणतात. हा त्रास बायकांना मासिक पाळी येण्याचा काही दिवस पूर्वी किंवा पाळी आल्यावर जाणवतो. तसेच काही बायकांना याचा फार त्रास होतो. त्यांना दररोज या समस्येला सामोरी जावं लागतं. 
 
बायकांना होणारा हा आजार प्रामुख्यानं अशक्तपणा, पोषक तत्त्वांची कमतरता झाल्यामुळे होतो. या त्रासापासून वाचण्यासाठी औषध आणि घरगुती उपाय दोन्ही ही प्रभावी आहेत. जर आपण या समस्येेेेला झुंज देत आहात तर या काही घरगुती उपचार केल्यानं आपल्याला एका आठवड्यातच या समस्येपासून मुक्तता होईल. मुख्य म्हणजे या उपचारांमुळे आपल्याला काहीही दुष्परिणाम होणार नाही.
 
मेथी दाणा : 
बायकांना या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी मेथीदाणे हा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी आपण तीन चमचे मेथी दाणा घ्या आणि त्यांना अर्धा तास अर्ध्या लीटर पाण्यात उकळवून घ्या. नंतर या पाण्याला गाळून घ्या. पाणी थंड झाल्यावर या पाण्याला पिऊन घ्या. दिवसातून किमान दोन वेळा तरी एक एक ग्लास पाणी प्यावं. मेथीदाणा हे मायक्रोफ्लोरा आणि पीएचच्या पातळी राखण्यास मदत करत. याचा दररोज सेवन केल्यानं एका आठवड्यातच आपल्याला या समस्ये पासून आराम मिळू शकतो.
 
* सकाळी केळी खावे :
फार कमी लोकांना हे माहीत असेल की केळी देखील बायकांच्या आरोग्याशी निगडित या समस्येला संपविण्यासाठी प्रभावी आहेत. बायकांनी दररोज सकाळी पिकलेलं केळ खावं. जर आपण केळीला साजूक तूप लावून खाल्ल्यानं आपणास त्वरित आराम मिळेल. याच बरोबर आपण केळीला साखर किंवा गुळा बरोबर देखील खाऊ शकता. याचे सेवन केल्यानं हानिकारक सूक्ष्म जंत शरीरातून बाहेर पडतील आणि आपल्याला या समस्येतून आराम मिळेल.
 
* धणे : 
धणे हे देखील आपल्याला पांढऱ्या पाण्याच्या त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकतात. यासाठी बायकांनी 100 ग्रॅम धणे रात्रभर 100 मि.ली. पाण्यात भिजवून ठेवावं. सकाळी हे पाणी गाळून पिऊन घ्या. असे केल्यानं विषारी पदार्थ बाहेर पडतात. दररोज असं करावं, एका आठवड्यात आपल्याला आराम मिळेल. 
 
* आवळ्याची आणि मधाची पेस्ट देखील फायदेशीर आहे :
आवळा तर नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असतो. बायकांना ल्युकोरियाच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी आवळा आणि मध हे प्रभावी आहे. या साठी दोन चमचे आवळ्याची भुकटी किंवा पूड घ्या आणि त्यामध्ये मध मिसळून घट्ट पेस्ट बनवा. या पेस्टला दिवसातून दोन वेळा खा. या व्यतिरिक्त आवळ्याचं सेवन पाण्यात उकळवून देखील करू शकता. पाण्यात हे टाकून पिण्याची पद्धत म्हणजे आपण एक कप पाण्यात एक चमचा आवळ्याची पूड किंवा भुकटी घालून त्या अर्ध कप होई पर्यंत उकळवून घ्या. आपणास हे चवीला कडवट लागत असल्यास या मध्ये आपण मध किंवा पुन्हा पाणी मिसळू शकता. दररोज हे प्यायल्यानं फायदा होणार.
 
* जांभळाची साल : 
या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी जांभळाची साल देखील एक प्रभावी उपाय आहे. या साठी आपण फक्त जांभळाच्या सालीची भुकटी बनवा. हे आपण दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्यासह दोन चमचे खावं. असं केल्यानं आपणांस एका आठवड्यातच आराम मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

रताळे आणि नाचणीचा आहारात समावेश वाढवा; उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

फ्युजन फूड: पारंपारिक थालीपीठाला द्या 'पिझ्झा ट्विस्ट'; लहान मुलांसाठी चविष्ट आणि घरगुती पिझ्झा थालीपीठ रेसिपी

Situationship "मैत्री की प्रेम?" या गोंधळात अडकणाऱ्या तरुणाईसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; स्पष्ट संवाद हाच सुखी नात्याचा पाया

Tatya Tope Information क्रांतिकारी सेनापती तात्या टोपे

Akshaya Tritiya festival Special अक्षय तृतीयेला अश्या प्रकारे बनवा 'परफेक्ट' शाही आम्रस

पुढील लेख
Show comments