suvichar

काही महत्वाच्या वास्तू टिप्स

Webdunia
शनिवार, 13 एप्रिल 2019 (14:58 IST)
स्वयंपाकघर : स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व-पश्चिम दिशेकडे असाव्या, ज्यायोगे वातावरणाचे विधायक धागे आकर्षित होऊ शकतील. ओट्यावर कोणते ही कपाट किंवा आलमारी ठेऊ नका, कारण त्यामुळे अकल्पित परिस्थिती उत्पन्न होण्याची भिती निर्माण होऊ शकेल. भोजन गृह आणि स्वयंपाकघर एकाच माळ्यावर असणे बरे असते. भोजन गृहात भिंतीवर हिरवा आणि पिवळा रंग असणे बरे.

स्टोर रूम : स्टोर रूममध्ये रॅक आणि अलमारी दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये ठेवण्यात यावी. दिवाण किंवा पलंग पेटीत वस्तूंची कधीही साठवण करू नये, कारण त्यामुळे घरातले चुंबकीय वातावरण बिघडते.
पूजा गृह : पूजागृहात देवता कधीही कोपर्‍यात ठोऊ नका. पूजागृहात किंवा देवळात भंगलेली मूर्ती ठेवण्यात येऊ नाही. पूजागृहाचे दार उत्तर किंवा पूर्वेकडच्या भिंतीत असावे.
 
 


लहान मुलांची खोली : मुलांच्या खोलीत गणपती किंवा सरस्वतीचे चित्र लावावे. मुलांच्या खोलीत पलंग या प्रकारे ठेवावा ज्यायोगे मुलांचे डोके दक्षिणकडे असेल. शरीराचे चुंबकत्व कायम राखण्यासाठी याची मदत होते. मुलांसाठी ईशान्येस किंवा घराच्या पश्चिमेकडे खोली असावी. मुलींसाठी वायव्येस खोली असावी. मुलांच्या खोलित रॅक किंवा कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावे.
डायनिंग टेबल : डायनिंग टेबल चौरस किंवा चतुष्कोणिय असावे, अंड्याच्या किंवा इतर कोणत्याही आकाराचे टेबल चांगले नसते. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या मधोमध ठेवण्यात यावे. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या पश्चिमेकडे ठेवावे.
 
तिजोरी : तिजोरीच्या खोलीचे दार ईशान्येस, पूर्वेस किंवा उत्तरेकडे ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लॉकर दक्षिण दिशेत ठेवावे आणि ते उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे उघडले जावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती बुधवारची

बुधवारी गणपतीचे 5 उपाय, मिळेल धन, वाढेल व्यवसाय...स्वप्ने पूर्ण होतील

Pana Sankranti 2026 पणा संक्रांती, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments