Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मातृ दिन विशेष मातृ दिन निबंध

मातृ दिन विशेष मातृ दिन निबंध
Webdunia
रविवार, 9 मे 2021 (09:54 IST)
अमेरिकेतील 28 व्या राष्ट्राध्यक्ष थॉमस वूडरॉ विल्सन यांनी 8 मे 1914 रोजी मे महिन्यातील दुसरा रविवार अधिकृतपणे मातृदिन म्हणून जाहीर केला. तेव्हा पासून दरवर्षी  मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृ दिन.आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेचा स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगितले आहे. आई हीच मुलाची प्रथम गुरु आहे. आई या शब्दाचा अर्थ आहे 'आ 'म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर .असे म्हणतात की ईश्वर या जगात सर्वत्र येऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आई आपल्या मुलांना चांगल्या संस्काराची शिदोरी लहान पणा पासूनच देते. मुलांचे सर्व जग किंवा विश्व त्यांची आईच असते. असा एकही दिवस नाही की आपल्याला आईवाचून काही अडले नाही. असे म्हटले आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे तंतोतंत खरेच आहे. जगातील सर्वात श्रीमंत तो आहे ज्याच्या कडे आई आहे. ज्याच्या कडे आईरूपी दैवत नाही मग तो राजा असो किंवा रंक त्याची दशा भिकारी सम आहे.   
आई आहे तर जगातील सर्व सुख आहे. आई वंदनीय आहे.खरं आहे.खरं तर तिला सन्मान देण्यासाठी कुठला खास दिवस कशाला पाहिजे ? ती तर दररोज सन्माननीय आहे. आदरणीय आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची ती काळजी घेते ,कष्ट करते ,घरासाठी राब- राब राबते. मुलांना चांगले संस्कार देते.  
मातृदिन संपूर्ण विश्वात साजरे केले जाते. पाश्चिमात्यांच्या देशात आईचे आभार मानण्याची पद्धत आहे. आईला काही भेट वस्तू देणे, तिच्या सोबतीने वेळ घालवणे, अश्या पद्धतीने हा दिन अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशात मातृदिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस आपल्या आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रश्न असा उद्भवतो की आपण आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का ? ती आपल्या कुटुंबासाठी झटत असते कष्ट करते तरीही कधी थकत नाही. हास्य मुखाने आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी करत असते . तिच्या या कष्टाला मानाचा मुजरा.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी

Fasting Recipe मखाना पराठा चैत्र नवरात्रीत नक्की ट्राय करा

उन्हाळ्यात काकडीचे सेवनाचे फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

पुढील लेख
Show comments