Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देणार

Webdunia
बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:41 IST)
मुंबई, पुण्याप्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
 
आभासी पद्धतीने झालेल्या या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानाहून सहभागी झाले होते. यासंदर्भातील सूचना डिसेंबर अधिवेशनात विनियोजन विधेयकाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्यानुषंगाने ही बैठक झाली. मुंबई आणि पुण्यातील इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना 39,000 रूपये आणि 30 हजार रूपये अनुक्रमे याप्रमाणे विशेष भत्ता दिला जात होता. मात्र अन्य शहरांमध्ये तो केवळ 11 हजार रूपये इतकाच होता.
 
फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात डॉक्टर्स आपले योगदान देत आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, पुण्याला एक न्याय आणि अन्य जिल्ह्यांना दुसरा असे करता येणार नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांसाठी एकच निकष लावण्यात यावा. देवेंद्र फडणवीस यांची ही मागणी अजित पवार यांनी तत्काळ मान्य केली आणि वित्त विभागाने प्रतिकूल अभिप्राय दिला असला तरी आपण त्यावर आदेश जारी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

LIVE: छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

नितीन गडकरींचा नागपूर विमानतळाबाबत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

पुढील लेख
Show comments