Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहांची तयारी, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांसोबत महत्त्वाची बैठक

Webdunia
सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (15:01 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासोबतच सत्तारूढ शिवसेना, भाजप आणि एनसीपीच्या महायुतीने सत्तामध्ये परताव्याची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमित शाह मुंबईमध्ये रविवारी संध्याकाळी दाखल झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे वरिष्ठ नेता अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली.
महाराष्ट्र दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले शाह यांनी ‘सहयाद्री’ राजकीय अतिथिगृह मध्ये शिंदे, फडणवीस आणि पवार यांची बैठक घेतली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी विभिन्न सरकारी योजनांना घेऊन  लोकांच्या प्रतिक्रियांवर चर्चा करण्यात आली. तसेच, अमित शहा यांनी राज्यातील भाजप नेत्यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी शहा यांनी पक्षश्रेष्ठींना सार्वजनिक वाद टाळण्याचा आणि जनतेसमोर एकसंघ प्रतिमा राखण्याचा सल्ला दिला. यावेळी शहा यांनी असेही सांगितले की, भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही आणि त्यानुसारच जागांबाबत निर्णय घेतला जाईल. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्यासह राज्यातील भाजपचे मोठे नेते उपस्थित होते. अमित शाह यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments