Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मटका किंग रतन खत्री याचं मुंबईत निधन

Matka King
Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (11:58 IST)
आकड्यांच्या जुगाराच्या खेळात स्वतःचं वर्चस्व निर्माण  करणारा मटका किंग रतन खत्री याचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. तो 88 वर्षांचा होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यातच त्याचं निधन झालं.

1960च्या दशकात मटका मुंबईतील सर्वच स्तरांत प्रचलित होता. कल्याण  भगत यानं 1962 मध्ये 'वरळी मटका' सुरू केला. रतन खत्री यानं त्याचा मॅनेजर म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र, दोनच वर्षांत भगतची साथ सोडून रतन खत्री यानं स्वतःचा 'रतन मटका' सुरू केला.

एका भांड्यातून चिठ्ठी काढून खेळला जाणारा हा जुगार इतका लोकप्रिय झाला की त्याची दिवसाची उलाढाल 1 कोटींपर्यंत गेली. मटकच्या लोकप्रियतेबरोबर रतन खत्रीचेही नाव झाले. हळूहळू मुंबईत तो 'मटका किंग' म्हणून ओळखला जाऊ लागला होता. रतन खत्री हा मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत राहत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. या आजारपणातून तो सावरला नाही. शनिवारी सकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

एआय टूल्सचा गैरवापर, बनावट व्हिडिओ बनवून अडकवण्याचा प्रयत्न, तरुण अभियंत्याने केली आत्महत्या

RCB vs GT: गुजरात टायटन्स संघाने आरसीबीविरुद्धचा सामना जिंकून या हंगामात सलग दुसरा विजय नोंदवला

LIVE: महाराष्ट्र सरकारने फायलींच्या मंजुरीची प्रक्रिया बदलली

मुंबई : मोदी आणि योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा

मुंबई सेंट्रलवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

पुढील लेख
Show comments