Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल, म्हणाले – ‘राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस कशी काय? राज्यातले काही नेते वेगळे आहेत का?’

Webdunia
शनिवार, 10 एप्रिल 2021 (09:45 IST)
च्या नावाचा उल्लेख न करता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले आहेत. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान लसीकरण केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन लस घेतात. तर महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना त्यांच्या घरी कोरोनाची लस कशी काय?, राज्यातले नेते काही वेगळे आहेत का? असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. अशामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. जे काही घडले ते घडले. पण यापुढे, जर एखाद्या राजकीय नेत्याला घरी बसून लस मिळाली, अशी घटना आमच्या निदर्शनास आली तर कडक कारवाई करू असा इशारा न्यायालयाने सरकारला दिला आहे.
 
विकलांग, 75 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती, दुर्धर आजारामुळे अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नसल्याने त्यांना घरी जाऊन लस द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका धृति कपाडिया व कुणाल तिवारी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. केंद्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, घरोघरी जाऊन लस देण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. जर घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात धोरण अस्तित्वात नाही. तर राजकीय नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन लस कशी देण्यात येते? राज्यातील नेत्यांना त्यांच्या घरी बसून लस मिळते आहे. घरोघरी जाऊन लस देणे हे तुमच्या धोरणात बसत नसेल तर राजकारण्यांसाठी तुमचे धोरण वेगळे कसे? सर्वांसाठी एकसमान धोरण हवे, असे मुख्य न्या. दत्ता यांनी म्हटले. तसेच राज्य सरकारकडे लसीचा साठा कमी आहे. या समस्येवर उपाय शोधावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी ठेवत म्हटले की, लस घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ कशी करता येईल, याचा आम्ही विचार करू असे न्यायालयाने म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

महाराष्ट्रात निकालाला चार दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही, शिंदे नाराज का?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक, भारतात गेले 26 वर्षे 'बनावट' म्हणून राहत होता

LIVE: रामदास आठवलेंनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केले

पुढील लेख
Show comments