Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार प्रकरणी एकाला अटक

arrest
Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (15:13 IST)
बदलापूर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने दोन जणांवर गोळीबार केल्याप्रकरणी 25 वर्षीय तरुणावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायातून हा हल्ला झाल्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी होम फलाटवर ही घटना घडली.या हल्ल्यात एकाला गोळी लागली तर दुसऱ्याचा जीव वाचला आहे. ही घटना केमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

गोळीबारानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात रेल्वे रुळाच्या दिशेने पळाला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

आरोपी आणि दोघांमध्ये रेल्वे स्थानकाबाहेर पैशांवरून वाद झाला, या वादातून एकाने दुसऱ्या मित्रावर गोळी झाडली. चौघे जण या ठिकाणी होते. एकाने या घटनेनन्तर पळ काढला. मात्र रेल्वेच्या सुरक्षाबलच्या जवानांनी त्याला पकडले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला. विकास पगारे असे या हल्लेखोराचे नाव आहे.

या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर गोंधळ उडाला. इतर तिघे हल्ल्यांनंतर पसार झाले. तर विकासाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बंदूक जप्त केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून इतर तिघांचा शोध सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री हनुमान चालीसा अर्थ सहित

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची राशी बदलेल, ३ राशींचे जीवन बदलेल, धन- समृद्धीचा वर्षाव होईल

जातक कथा : दयाळू मासा

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

'महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू देणार नाही', उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

LIVE: 'महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू देणार नाही' म्हणाले उद्धव ठाकरे

रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाले- आंदोलन योग्य आहे पण दबाव योग्य नाही

भारतात चित्त्यांची संख्या वाढणार, या देशांच्या घनदाट जंगलांमधून "पाहुणे" आणले जातील

दिल्ली : २० वर्षे जुनी ४ मजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments