Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पायल तडवी आत्महत्या, आरोपी महिला डॉक्टरांना पुढचं शिक्षण घेता येणार नाही

Webdunia
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (10:05 IST)
नायर रुग्णालयातील पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपी महिला डॉक्टरांना पुढचं पदव्युत्तर शिक्षण घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुढील शिक्षण घेऊ देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्यांना ही परवानगी नाकारली आहे. ‘जर आरोपी डॉक्टर पुन्हा महाविद्यालयात गेल्या, तर कनिष्ठ डॉक्टरांमध्ये चुकीचा संदेश जाईल, साक्षीदारांवर दबाव येऊ शकेल. त्यामुळे या तिघी डॉक्टर त्यांच्यावरचा खटला संपल्यानंतर शिक्षण पूर्ण करू शकतात’, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.
 
मागील वर्षी २२ मे २०१९ रोजी डॉ. पायल तडवी हिने नायर रुग्णालयातील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याआधी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून या तिघींनी जामीन देण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

LIVE: शरद पवार गटाच्या महिला शाखेने राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र लिहिले

शरद पवार पक्षाच्या महिला शाखेने महिला सुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलले, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

नेपाळ पुन्हा एकदा भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला

बैलाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू तर एक जण जखमी

ठाणे येथे शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ४७ लाख रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments