rashifal-2026

आजपासून शाळा पूर्ण क्षमतेने भरणार आहेत

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (12:22 IST)
Mumbai School Reopen : मुंबईतील सर्व व्यवस्थापनाच्या, शिक्षण मंडळांच्या, माध्यमांच्या शाळा बुधवारपासून पूर्ण क्षमतेने भरणार आहेत. आजपासून मुंबईतील सर्व शाळा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेनं सर्व शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 
 
काळजी घेण्याच्या सूचना
 
* सहव्याधी किंवा गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांकडे पालकांचे संमतीपत्र असणे बंधनकारक असेल.
* विद्यार्थ्यांना सर्दी, घसादुखी अशी करोनासदृश्य लक्षणे आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये.
* शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासावे.
* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के आवश्यक आहे.
* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण असावे.
* विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी शाळांमध्ये शिबिरांचे आयोजन करावे.
* शाळेत मधली सुट्टी असेल व मधल्या सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल.
* विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी खासगी बससेवा व बेस्ट बसमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी.
* मैदानी खेळ व कवायतींच्या वेळी मुखपट्टी बंधनकारक नसली तरी वर्गात, शाळेच्या बसमध्ये, शालेय परिसरात मास्क बंधनकारक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

मुंबईतील बिहार भवनावरून राजकारण का सुरू आहे? मनसे नेत्याने बांधकाम थांबवण्याचा इशारा दिला

LIVE: धनुष्यबाण आणि घड्याळाचे खरे मालक कोण? आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

शिवसेना -NCP पक्ष चिन्हाबाबत आज सुनावणी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस : महाभारत आणि बौद्ध काळात पण लोकतंत्र होते का?

India vs New Zealand आज नागपूरमध्ये टीम इंडिया किवी संघाशी सामना करेल

पुढील लेख
Show comments