Festival Posters

अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार

Webdunia
मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:34 IST)

भारतीय सैन्याने आणि काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. यात्रेवर हल्ला करणारे टॉपचे तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचं ट्वीट शेष पॉल वेद यांनी केलं आहे.  सूत्रधार अबू इस्माईलच्या खात्म्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे अबू माविया, फुरकान आणि यावर यांना कंठस्नान घातलं, असं ट्वीट वेद यांनी केलं आहे.

सोमवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर पोलिस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत एक भारतीय जवानही शहीद झाला आहे.  याआधी 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments