Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशासाठी शनिवार अपघातवार, ७ अपघात तीस ठार

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (16:12 IST)
आजचा शनिवार   महाराष्ट्रासाठी घातवार ठरला आहे. राज्यात  दिवसाची सुरुवात झाली  सांगली येथील पाच पैलवानांसह सहा जणांच्या मृत्यूच्या बातमीने. तर दुसरीकडे डहाणूतील शालेय मुलाना घेवून जाणारी बोट उलटली आणि  दुर्घटना झाली. तर  ओएनजीसी हेलिकॉप्टर समुद्रात कोसळून झालेला अपघात यासारख्या घटनांमध्ये काही जणांनी प्राण गमावले आहे. तर देशभरातील नऊ शहरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या विविध अपघातांमध्ये ३०  जणांचा मृत्यू झाला आहे.

यात पहिला अपघात सांगलीत झाला आहे. यामध्ये वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण पैलवान आणि गाडीचालक अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबत प्रवास करणारे इतर  पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना घडला आहे. शिरगाव फाट्याजवळ ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला होता. 
दुसरीकडे 
डहाणूमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटली आहे.  या बोटीत 40 विद्यार्थी होते, त्यापैकी 32 विद्यार्थ्यांना बाहेर काढले असून  दोघी विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला आहे. तर उर्वरित  बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे. सेल्फी घेताना तोल जाऊन बोट कलंडली आहे.
एनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणूजवळच्या समुद्रात सापडले असून यामध्ये  तिघांचा मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरचा सकाळी साडेदहाच्या सुमारास संपर्क तुटला होता. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते.
राजकोटच्या उपलेटामध्ये राष्ट्रकथा शिबीरात आग लागून तीन विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून सोबत 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. 
जयपूरमधील विद्याधरनगर भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. 
कर्नाटकमध्ये हासन तलावात प्रवाशांनी भरलेली KSRTC ची बस कोळून मोठा अपघात झाला. यामध्ये 8 जणांना जीव गमवावा लागला, तर 15 जण जखमी आहेत.
कर्नाटकमध्ये रिक्षा झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच मृत्युमुखी पडले, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे आजचा शनिवार देशासाठी घातवार ठरला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments