rashifal-2026

कॉंग्रेस घालणार नोटबंधीचे श्राद्ध

Webdunia
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (13:50 IST)

नोटबंधी मुळे देशाचे नुकसान झाले असून त्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष नोटबंधीचे श्राद्ध घालणार आहे.   ८ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याने कॉंग्रेस यादिवशी  असा निषेद करणार अशी  माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की आपल्या देशात  नोटाबंदीनंतर  विकासाचा दर फार मोठ्या प्रमाणात खाली उतरला आहे. जर आपण पाहिले तर युपीए  सरकारच्या काळात  ९.२ % विकास दर आता ५.७ % झाला आहे. तर  तज्ज्ञांच्या मते हा दर  २ %  टक्क्यांवर आहे.

भाजपमधीलच काही नेते आता नोटाबंदीमुळे सरकारची फसगत झाल्याचे करतांना दिसत आहे.  पंतप्रधान ही गोष्ट कबुल करणार नाही. आपल्या  देशातील काळा पैसा हा जमिनी, बोगस कंपन्या आणि विदेशी बँका यामाध्यमातून अडकलेला आहे तो बाहेर काढणे शक्य नाही .तर बाजारात फिरत असलेला पैसा हा सामान्य नागरिकांचा होता.  अत्यंत नगण्य होता. मात्र  देशाचे ८६ टक्के चलन रद्द करून नवे आणले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारा हा निर्णय आहे. ८ नोव्हेंबर रोजी आम्ही जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाचा निषेध करणार आहे. हे स्पष्ट केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments