rashifal-2026

मुजफ्फरनगर प्रकरण : युपी पोलिसांचा जावई शोध ५ वर्षाचा मुलगा आरोपी

Webdunia
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (16:56 IST)
युपी आणि बिहार मध्ये काही ही होवू शकते. असाच प्रकार उत्तर प्रदेश येथे घडला आहे. मुझफ्फरनगर येथील शामली गावात दोन गटात झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींसह एका पाच वर्षाच्या मुलाला अटक केली आहे. सोबतच त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवला आहे. युपी मध्ये पोलिसांच्या या अजब कारभारामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुलाच्या पालकांनी  धाव घेतली आहे.
 
शामली गावात राहणाऱ्या मनोज व महिपाल या दोन तरुणांमध्ये 12 सप्टेंबर रोजी पत्ते खेळण्यावरून वादावादी झाली. पण हा वाद येथेच संपला नाही तर दोन्ही तरुणांनी आपल्या मित्रांना बोलावले. त्यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. हे सर्व प्रकरण झाले ठेव्हां एक पाच वर्षाचा मुलगाही उपस्थित होता. त्यामुळे पोलिसांनी सर्व आरोपींबरोबर त्याचेही नाव तक्रारीत नोंदवले आहे. सोबतच त्याच्यावर देखील गुन्हा नोंदविला आहे. त्याच्यावर घातक शस्त्रांनी मारहाण केल्याप्रकरणी भादंवि कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तक्रारीत आरोपींच्या वयाचा उल्लेख नसल्याने हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पालकांनी भेट घेत सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. हे ऐकूण योगींनाही धक्का बसला. त्यानंतर आरोपींच्या नावाच्या यादीतून मुलाचे नाव हटवा अशी सूचना त्यांनी पोलिसांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments