Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हावेरी येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 28 जून 2024 (08:26 IST)
कर्नाटकातील हावेरी येथे भीषण रस्ता अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हावेरी येथील बडगी येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वाहनाला धडक बसली. हावेरी जिल्ह्यातील बडगी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला.

रस्त्यावर उभ्या असलेल्या एका लॉरीला धडकल्याने प्रवासी वाहनाचे पूर्ण नुकसान झाले. कारमध्ये लोकांचे मृतदेह सापडले. अग्निशमन दलाचे जवान वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढत आहेत. 
 
पोलिसांनी सांगितले की, मृत शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील होलेहोन्नूरजवळील एमिहट्टी गावातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोली मायाम्माला भेट देऊन एक व्यक्ती आपल्या मूळ गावी परतत असताना हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्या 13 जणांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. 
 
अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी टीटी वाहनातून मृतदेह बाहेर काढले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू  आहे. 
 
13 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून एमेहट्टी गावातील लोकांना धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेले सर्व लोक एकाच गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ट्रम्प-बायडन डिबेट: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?

IND vs ENG: भारताने इंग्लंडचा पराभव केला,अंतिम फेरीत धडक मारली

70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मिळणार मोफत उपचार, राष्ट्रपतींची मोठी घोषणा

नवनीत राणांची असदुद्दीन ओवेसी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कारण जाणून घ्या

शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, रेट सांगा; षंढांना घाणेरडी मागणी केल्याने बिहार पोलिसांना मारहाण !

पुढील लेख
Show comments