Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार्जिंग करताना मोबाईलचा स्फोट,चार मुलांचा होरपळून मृत्यू

Webdunia
रविवार, 24 मार्च 2024 (16:24 IST)
मेरठमधील मोदीपुरमच्या जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका मजुराच्या घरात शॉर्टसर्किटमुळे मोबाईलचा स्फोट झाला आणि खोलीला आग लागली. खोलीत उपस्थित चार मुले गंभीररीत्या भाजली. मुलांना वाचवण्यासाठी आलेले दाम्पत्यही भाजले. लोकांनी पोलिसांना कळवले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पोलिसांनी सर्वांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान चारही मुलांचा मृत्यू झाला. सध्या या दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक आहे.24 तासांच्या आत चारही मुलांनी हे जग सोडले. मुलांच्या आईला गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. 

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिखेडा येथे राहणारा जॉनी (41) हा मजूर म्हणून काम करतो. ते पत्नी बबिता (37) आणि चार मुले सारिका (10), निहारिका (8), गोलू (6) आणि कल्लू (5) यांच्यासह मोदीपुरम येथील जनता कॉलनी येथे एका घरात भाड्याने राहतात.
शनिवारी सायंकाळी खोलीत मुले खेळत असल्याचे सांगण्यात आले. खोलीतील पलंगावर तारा विखुरलेल्या होत्या आणि मुले मोबाईल चार्जर इलेक्ट्रिकल बोर्डला लावत होते. चार्जर बसवताना शॉर्ट सर्किट झाला. तारांना आग लागल्याने मोबाईलचा स्फोट होऊन बेडने पेट घेतला.
 
त्याचवेळी आगीने वेढलेल्या मुलांनी आरडाओरडा सुरू केला. स्फोट आणि मुलांचा आवाज ऐकून जॉनी आणि बबिता स्वयंपाकघरातून खोलीकडे धावले. दोघांनीही जळालेल्या अवस्थेत मुलांना आगीतून बाहेर काढले. मुलांना वाचवताना बबिता आणि जॉनीही गंभीररित्या भाजले. जॉनीच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आले.
 
उपचारादरम्यान सारिका आणि कल्लूचाही मृत्यू झाल्याचे पोलीस स्टेशन प्रभारी मनेश कुमार यांनी सांगितले. कुटुंबीय आधी शवविच्छेदनास नकार देत होते पण आता शवविच्छेदन केले जात आहे. वडील जॉनी यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर आई बबिता यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments