suvichar

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांची माहिती का लपवली जाते?

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (17:21 IST)

पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या लाभांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या परदेश दौऱ्यांद्वारे होणाऱ्या लाभांची गणना केली जात नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय सूचना आयोगाला सांगितले आहे. कीर्तिवास मंडल या RTI कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदींच्या परदेशी दौऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या लाभांची माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत मागितली होती. मात्र मंडल यांना त्याबाबत माहिती मिळाली नाही. देशाचे पंतप्रधान हे देशाचे प्रधानसेवक आहेत. त्यांनी परदेश दौऱ्यावर किती खर्च केला, त्या दौऱ्यांमधून देशाला काय मिळाले, याबाबत त्यांनी माहिती द्यायला हवी. जर माहिती लपवली जात असेल तर त्याचे कारण काय? याबाबत खुलासा व्हायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments