Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘पद्मावत’ साठी पोलिसांचा पहारा

Webdunia
बहुचर्चित ‘पद्मावत’  चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात राजपूत संघटनांनी देशभर तीव्र आंदोलन उभारले असून, ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळ  सुरू आहे. मुंबई, नाशिकसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यांत करणी सेनेचे समर्थक रस्त्यांवर उतरले आहेत. दिल्ली-जयपूर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला तर मथुरेत रेल रोकोचे झाला. 
 
मुंबईत ‘पद्मावत’विरोधात रस्त्यावर उतरलेल्या 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहमदाबादेत 40 वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केंद्रीय गृह मंत्रालय अ‍ॅलर्ट झाले आहे.  गुरुग्राम येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथेही हे कलम लागू करण्यात आले आहे. राजस्थानात चित्तोडगड येथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
 
मुंबईतल्या 140 चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावत’ झळकत आहे. सर्वच शो हाऊसफुल्ल बुक झाले आहेत. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज झाले असून, त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चित्रपटगृहांच्या मालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments