Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्र भेटीवर

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (08:20 IST)
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी यावेळी राष्ट्रपतींचे स्वागत केले.
राष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी मुंबईतील राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार आहे. तसेच दि. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर येथे भेट देणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments