Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदी आज 'वीर बाल दिवस' कार्यक्रमात सहभागी होणार, पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करणार

Webdunia
गुरूवार, 26 डिसेंबर 2024 (11:13 IST)
Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार 26 डिसेंबर दुपारी 12 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'वीर बाल दिवस' कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तसेच देशाच्या भवितव्याचा पाया असलेल्या बालकांचा गौरव करणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमात उपस्थितांनाही पंतप्रधान संबोधित करतील. याशिवाय पंतप्रधान 'सुपोषित पंचायत अभियान' सुरू करणार आहे. पोषण-संबंधित सेवांच्या अंमलबजावणीला बळकट करून आणि सक्रिय समुदायाचा सहभाग सुनिश्चित करून पोषण परिणाम आणि कल्याण सुधारणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
ALSO READ: धुळ्यात धूमस्टाईलने येऊन चोरांनी चेन हिसकावून पळ काढला
मिळालेल्या माहितीनुसार या दिवसाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात अनेक उपक्रम सुरू केले जातील. तसेच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) पुरस्कार विजेते देखील उपस्थित असतील.
आज सुपोषित ग्रामपंचायत अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने उत्कृष्ट 10 हजार ग्रामपंचायतींना बक्षीस देण्यात येणार आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments