rashifal-2026

अफवांमुळे होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच सोशल मीडिया धोरण आणणार

Webdunia
बुधवार, 4 जुलै 2018 (09:35 IST)
सोशल मीडियात पसरणाऱ्या अफवांमुळे मागील चार महिन्यांपासून देशभरात  जमावाने 29 लोकांचे बळी घेतले आहेत. हि गंभीर बाब सरकारला वाटू लागली आहे. नुकत्याच धुळे येथे अश्याच अफवेने ५ निष्पाप लोकांचा बळी जमावाने घेतला आहे. तर देशात अनेक ठिकाणी अश्या घटना घडल्या आहेत. आयटी मंत्रालयाकडे सोशल मीडिया धोरणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गृहमंत्रालय सोशल मीडिया प्रतिनिधींसोबत एक बैठक घेणार आहे. या बैठकीत सोशल मीडियातून पसरवण्यात येणारे खोटे मेसेजेस कसे रोखायचे, यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे कायद्याच्या   अखत्यारीत येवून मोठी शिक्षेची तरतूद केली जाणार आहे असे चित्र आहे. आयटी मंत्रालय आणि ट्विटर,व्हॉट्सअप तसंच फेसबुकच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात येईल. या बैठकीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल,’असं गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आयटी अॅक्टच्या कलम 69 चा वापर करत अशांतता पसरवणारे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज पसरण्याआधीच ब्लॉक केले जावेत, असं या बैठकीत सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सांगण्यात येणार असून त्यामुळे अनेक बंधने येणार आहेत.आयटी अॅक्टच्या कलम 69 चा वापर करत अशांतता पसरवणारे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज पसरण्याआधीच ब्लॉक केले जावेत, असं या बैठकीत सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सांगण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments