Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

Webdunia
गुरूवार, 16 मे 2024 (14:54 IST)
Swati Maliwal Assault Case आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. पोलिस विभागाच्या विशेष सेलचे अतिरिक्त सीपी प्रमोद कुशवाह आणि अतिरिक्त डीसीपी उत्तर सध्या स्वाती मालीवाल यांच्या घरी आहेत आणि प्रकरणाची माहिती घेत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) विभव कुमार यांना समन्स बजावले आहे, जे मारहाण प्रकरणातील आरोपी आहे. त्यांंना उद्या आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण काय आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. दिल्लीच्या सीएम हाऊसमध्ये हा हल्ला झाला. त्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. विभव कुमार आले तेव्हा त्या ड्रॉईंग रूममध्ये बसल्या होत्या. बोलत असताना त्यांच्यासोबत दुर्व्यव्हार करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू लागले. एवढेच नाही तर त्यांना अभद्रता करत मारहाणही केली.
 
स्वाती यांनी डायल 112 वर कॉल करून दिल्ली पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी त्या पोलिस ठाण्यातही गेल्या होत्या, मात्र त्यांनी तोंडी तक्रार दिली. लेखी तक्रार देते असे सांगून त्या निघून गेल्या. त्यानंतर हे प्रकरण खूप चर्चेत आहे. भाजप नेत्यांनीही याप्रश्नी निवेदने देऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान खासदार संजय सिंह यांनी निवेदन दिले की मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली असून कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
 
पोलिस काय म्हणाले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार स्वाती मालीवाल यांनी केलेल्या कॉलबद्दल डीसीपी (उत्तर) मनोज मीणा यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, सकाळी 9.30 च्या सुमारास पीसीआरवर कॉल आला होता. कॉलरने स्वत:ची ओळख स्वाती मालीवाल म्हणून दिली आणि दिल्ली हाऊसमध्ये त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. फोन येताच सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पोलिस पथक सीएम हाऊसमध्ये गेले, मात्र स्वाती मालीवाल तेथे आढळून आल्या नाहीत. पथक परत गेले, पण काही वेळाने स्वाती मालीवाल पोलिस ठाण्यात आल्या, मात्र त्यांनी या प्रकरणाची तोंडी माहिती दिली. नंतर लेखी तक्रार देते असे सांगून त्या निघून गेल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

पुढील लेख
Show comments